Kokan Top 10 Places: कोकणात फिरायला जात असाल तर ही TOP 10 ठिकाणं नक्की पाहा, हिरव्यागार निसर्गात जाल हरवून

Sakshi Sunil Jadhav

मालवण - तारकर्ली (सिंधुदुर्ग)

सिंधुदुर्ग किल्ला, रॉक गार्डन आणि देवबाग ही ठिकाणं तुम्ही कोकणात फिरु शकता. तिथे तुम्हाला स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग आणि डॉल्फिन पाहता येतील.

Kokan Top 10 Places:

गणपतीपुळे (रत्नागिरी)

कोकणातलं प्रसिद्ध गणपती मंदिर आणि आरे-वारे बीच खूप प्रसिद्ध आहे. तिथे तुम्हाला पॅरासेलिंग, समुद्रस्नान आणि फोटोग्राफीसाठी ही ठिकाणं पाहता येतील.

Ganpatipule temple

दापोली (रत्नागिरी)

मुरुड बीच, हर्णे बंदर आणि पन्हाळेकाजी लेणी तिथला इतिहास खूप सुंदर आहे. तिथे तुम्हाला डॉल्फिन सफारी, वॉटर राईड्स आणि ट्रेकिंगचा अनुभव घेता येईल.

Ganpatipule temple

अलिबाग (रायगड)

कुलाबा किल्ला, नागाव बीच आणि मांडवा ही खूप लोकप्रिय पर्यटन स्थळं आहेत. तिथे जवळच जेट स्की, बनाना राईड आणि सी-फूड टेस्टिंगसाठी तुम्ही अलिबाग प्रसिद्ध आहे.

Alibaug beach

गुहागर (रत्नागिरी)

व्याडेश्वर मंदिर आणि शांत समुद्रकिनारा मनाला प्रसन्न करेल. बोट राईड, मंदिर दर्शन आणि रिलॅक्सेशनसाठी तुम्ही या ठिकाणी फिरण्याचा प्लान करु शकता.

Dapoli dolphin safari

हरिहरेश्वर (रायगड)

काळभैरव मंदिर आणि प्रदक्षिणा मार्ग धार्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याने भरलेला आहे. तिथे डोंगर-कडा ट्रेकिंग, बोटिंग आणि पॅराग्लाइडिंग अशा सगळ्याचा अनुभव घेता येतो.

Harihareshwar temple

वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

लाइटहाऊस, सागरेश्वर बीच आणि शिरोडा हे समुद्रकिनारे शांत आणि सुंदर आहेत. तिथल्या कयाकिंग, फिशिंग आणि लाइटहाऊस ट्रेकमुळे पर्यटकांना खास अनुभव मिळतो.

Vengurla beach

माथेरान (रायगड)

पॅनोरमा पॉइंट, इको पॉइंट आणि शार्लोट लेक निसर्गप्रेमींसाठी बेस्ट आहे. हॉर्स रायडिंग, टॉय ट्रेन आणि ट्रेकिंगमुळे कुटुंबासोबत मजा करता येते.

Matheran hill station

रत्नागिरी शहर

थिबा पॅलेस, रत्नादुर्ग किल्ला आणि मांडवी बीच अशी प्रसिद्ध ठिकाणे तुम्हाला इथे पाहता येतील. फोर्ट एक्सप्लोरिंग, अ‍ॅक्वेरियम भेट आणि सनसेट वॉचसाठी हे ठिकाण बेस्ट आहे.

Matheran hill station

दिवेआगर (रायगड)

सुवर्ण गणेश मंदिर आणि मोठा समुद्रकिनाऱ्याचा अनुभव कोकणात गेल्यावर नक्कीच घ्या. घोडागाडी सफारी, जेट स्की आणि कोस्टल ड्राईव्हमुळे तुमची ट्रीप आणखी मजेशीर होईल.

romantic getaway Maharashtra

NEXT: डाएटमध्ये भाकरीसोबत खा ही एक भाजी, फॅट होईल ७ दिवसातच कमी

paneer bhurji diet
येथे क्लिक करा