Sakshi Sunil Jadhav
सध्या अनेकांना फीट राहायला आवडतं. त्यामुळे त्यांच्या आहारात पोटीनयुक्त पदार्थांचा समावेश असतो.
फीट राहण्यासाठी योगा, व्यायाम यासोबत हेल्दी पदार्थ खाल्ले पाहिजेत. ज्यामध्ये पनीरचाही समावेश असेल. तुम्हाला नुसतं पनीर आवडत नसेल तर तुम्ही पनीरची सोप्या पद्धतीने भुर्जी बनवून खाऊ शकता.
डाएट पनीर भुर्जी बनवताना लो-फॅट पनीर वापरणं महत्त्वाचं आहे. यामुळे कॅलरी कमी राहतात आणि प्रोटीनचं प्रमाण टिकून राहतं.
फक्त 1 चमचा तेल वापरून तुम्ही ही भुर्जी बनवू शकता. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो.
पनीरमध्ये भरपूर प्रोटीन असतं. त्याने स्नायू मजबूत होतात. जिम करणाऱ्यांसाठी हा परफेक्ट नाश्ता आहे.
कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरचीमुळे फायबर वाढतं. तसेच पचन सुधारतं आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं.
हळद, धणे पावडर आणि कमी तिखट वापरणं फायदेशीर आहे. त्यामुळे रेसिपी हेल्दी आणि पचायला हलकी राहते.
जिऱ्याची फोडणी देऊन भाज्या परतून शेवटी पनीर मिक्स करायचं. फक्त 10 ते15 मिनिटांत ही रेसिपी तयार होते.
तुम्ही ही पनीर भुर्जी सकाळच्या किंवा दुपारच्या आहारात खावीत. याने शरीराला दिवसभर एनर्जीही मिळते.