Sakshi Sunil Jadhav
Jioचे अनेक स्वस्तपासून महागडे रिचार्ज प्लान्स आहेत. यामध्ये फक्त कॉलिंग आणि डेटा नाही, तर अनेक सुविधांचा समावेश असतो.
रिलायन्स Jio नेहमीच त्यांच्या ग्राहकांचा विचार करुन नवनवीन प्लान सादर करत असतं. पुढील प्लान हा भन्नाट प्लान आहे.
तुम्ही जर वर्षभराचा रिचार्ज एकदाच करण्याचा विचार करत असाल तर हा रिचार्ज तुम्हाला परवडणारा असेल. याने महिन्याला रिचार्ज करण्याचं टेन्शन मिटेल.
Jioच्या या वर्षभराच्या प्लानची किंमत ही १७४८ रुपये आहे. हा सगळ्यांच्याच खिशाला परवडणारा रिचार्ज प्लान आहे असं आपण म्हणू शकतो.
तुम्हाला हा रिचार्ज प्लान Jioच्या ऑफिशिअल वेबसाईटवर माय जिओ अॅपच्या लिस्टवर पाहायला मिळेल.
तुम्ही जर हा रिचार्ज केलात तर तुम्हाला तब्बल ३३६ दिवस म्हणजे जवळपास ११ महिने हा रिचार्ज मिळणार आहे.
Jioचा हा रिचार्ज प्लान अनलिमिटेड कॉलिंग आणि रोमिंगचा समावेश करुन वापरायला मिळणार आहे.
Jioच्या १७४८ रुपयांच्या रिचार्जमध्ये डेटा वापरायला मिळत नाही. यामध्ये फक्त कॉलिंगचा समावेश असतो.
तुम्ही या रिचार्जमध्ये एकूण ३६०० एसएमएस करु शकता. यात दिवसाचे बंधन नाही.