Sakshi Sunil Jadhav
Bigg Boss मराठीच्या सीजन ६ चा निकाल काल रात्री लागला आणि विजेती ठरली तन्वी कोलते.
सध्या सोशल मीडियावर फक्त तन्वी कोलतेचीच चर्चा सुरु आहे. हा प्रवास उत्कृष्ठच होता.
अनेकांना तन्वीबद्दल बऱ्याच गोष्टी माहित नाही. पुढील बातमीत आपण तिच्याबद्दल थोडक्यात काही गुपितं जाणून घेणार आहोत.
तन्वीचा जन्म हा ७ फेब्रुवारी, १९९८ मध्ये झाला होता. तर ती महाराष्ट्रातल्या रत्नागिरीची कन्या आहे. तन्वी कोलतेही मराठी सिनेसृष्टीतली एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर हिचं वय हे २८ वर्षे आहे.
तन्वीने तिचे शिक्षण पुण्यातल्या सिंहगड इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अॅन्ड सायन्स (एसआईटीएस) मधून बी. टेकची डिग्री मिळवली आहे.
तन्वी कोलते तिच्या शालेय जीवनात अनेक स्टेज शो आणि नाटकांमध्ये सहभागी व्हायची. याच प्रवासातून तिने मराठी फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकलं.
पुढे तन्वीने मनोरंजन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. तसेच तीने मॉडलिंगमध्ये तिचा प्रवास सुरु केला आहे.
२०१८ मध्ये तन्वीने मिस रत्नागिरी आणि २०२० मध्ये मिस गोवा हा पुरस्कार मिळवला होता. ही माहिती गुगलवर उपलब्ध आहे.