

आपल्या दररोजच्या धावळीत थकवा, श्वास लागणं किंवा पोटाच्या तक्रारी या गोष्टी आपण नेहमीच हलक्यात घेत असतो. पण डॉक्टरांचा इशारा स्पष्ट आहे की, या सामान्य वाटणाऱ्या लक्षणांमागे हृदयाशी संबंधित गंभीर समस्या लपलेल्या असतात. खास करून महिलांनी या संकेतांकडे दुर्लक्ष करू नये. अनेकदा हार्ट अटॅक येण्यापूर्वी महिलांचं शरीर असे संकेत देत असतं.
महिलांमध्ये सर्वात आधी दिसणाऱ्या लक्षणांपैकी एक म्हणजे अचानक येणारा थकवा. हा रोजच्या कामानंतर येणारा साधा थकवा नसतो. अगदी साधी कामं किंवा थोडं चालणं अशा कामांनंतरही महिलांना थकल्यासारखं वाटू शकतं. यावेळी तुमचं हृदय व्यवस्थित रक्त पंप करू शकत नसल्यामुळे हा थकवा जाणतो.
पूर्वी जी कामं तुम्ही सहजरित्या करत असलेली ती जर आता करताना तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर हा गंभीर इशारा असू शकतो. हृदय आणि श्वसनाची प्रक्रिया ही एकमेकांशी जोडलेली आहे. हृदय नीट काम करत नसेल तर फुफ्फुसांमध्ये द्रव साचू शकतो आणि त्यामुळे दीर्ध श्वास घेणं कठीण होतं.
हार्ट अटॅक म्हणजे फक्त छातीत दुखणं, असा समज अनेकांचा असतो. पण प्रत्यक्षात वेदना शरीराच्या इतर भागांमध्येही जाणवू शकतात. हृदयाशी संबंधित नसांमुळे जबडा, मान, पाठ किंवा दोन्ही हातांमध्ये दाब, ताण किंवा दुखणं जाणवू शकतं. जर या वेदना कोणत्याही कारणाशिवाय होत असतील तर त्याची त्वरित तपासणी गरजेची आहे.
काही वेळा हार्ट अटॅकची लक्षणं पोटाच्या तक्रारींसारखी वाटतात. छातीत जळजळ, अॅसिडिटी किंवा पोट फुगल्यासारखं वाटणं अशा तक्रारी अनेकांना होतात. काही जण वरच्या पोटात वेदना जाणवू लागतात.
कोणतीही शारीरिक मेहनत न करता किंवा गरम वातावरण नसताना अचानक थंड घाम येणं हे शरीरावर ताण आल्याचं चिन्ह आहे. यासोबत डोके हलकं होणं किंवा बेशुद्ध पडण्याची परिस्थितीही निर्माण होऊ शकते. हृदयातून मेंदूकडे जाणारा रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे ही अवस्था निर्माण होते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.