Low Heart Rate: अचानक हार्ट रेट कमी होऊ लागला तर काय कराल? घरच्या घरी यावर उपाय शक्य आहेत का?

what happens when heart rate is too low: हार्ट रेट कमी होणं म्हणजे ब्रॅडिकार्डिया ही गंभीर समस्या ठरू शकते. याची लक्षणं, कारणं आणि योग्य वेळी घ्यायची काळजी जाणून घ्या आणि आपल्या हृदयाचं आरोग्य जपा.
Low Heart Rate
Low Heart Ratesaam tv
Published On

आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या शरीराची योग्य पद्धतीने काळजी घेत नाही. यावेळी आपण छोट्या-छोट्या लक्षणांकडेही दुर्लक्ष करतो. पण हार्ट रेट कमी होणं ही अशीच एक गोष्ट आहे ज्याचं वेळेत निदान झालं नाही तर ते गंभीर ठरू शकतं. हार्ट रेट कमी होण्याच्या या स्थितीला वैद्यकीय भाषेत ‘ब्रॅडिकार्डिया’ असं म्हटलं जातं.

तज्ज्ञांच्या मते, एका निरोगी व्यक्तीचा हार्ट रेट साधारणपणे 60 ते 100 बीट्स प्रति मिनिट असतो. जर हा रेट 60 च्या खाली गेला तर तो कमी मानला जातो. परंतु प्रत्येक वेळी कमी हार्ट रेट धोकादायक ठरतोच असं नाही. गाढ झोपेत असलेल्या व्यक्तींमध्ये हार्ट रेट कमी असू शकतो.

Low Heart Rate
Urine color meaning: सकाळच्या लघवीचा रंग तुम्हाला काय सांगतो? हे संकेत सांगतात की तुमची किडनी खराब होतेय

बंगळुरूतील नारायणा हेल्थ सिटीमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण कुमार उल्लेगद्दी यांनी द हेल्थ साईट या वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, हार्ट रेट कमी होण्याची समस्या तेव्हा उद्भवते ज्यावेळी हृदय शरीराला आवश्यक तेवढ्या प्रमाणात ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवू शकत नाही. अशा वेळी काही स्पष्ट लक्षणं दिसू लागतात.

काय लक्षणं दिसून येतात?

  • चक्कर येणं

  • खूप थकवा जाणवणं

  • श्वास घेण्यास त्रास होणं

  • छातीत दुखणं

  • मानसिकरित्या गोंधळ उडणं.

हार्ट रेट कमी होण्यामागे कारणं

हार्ट रेट कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. मुख्य कारण म्हणजे हृदयाच्या इलेक्ट्रिकल सिस्टीममध्ये बिघाड होणं. ज्यामुळे हृदयाचे ठोके नियंत्रित करणारे सिग्नल योग्य पद्धतीने काम करत नाहीत.

काही वेळा उच्च रक्तदाब किंवा डिप्रेशनसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांचा साइड इफेक्ट म्हणूनही हार्ट रेट कमी होऊ शकतो. अशा परिस्थितीत अचूक निदानासाठी ईसीजी किंवा होल्टर मॉनिटरिंगची गरज असते.

Low Heart Rate
Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यावर घरीच्या घरी करता येतील असेल असे उपाय नाहीत. मात्र अचानक हार्ट रेट कमी झाल्यास आणि अशक्तपणा किंवा डोळ्यासमोर अंधारी येत असल्यास संबंधित व्यक्तीला सपाट जागेवर झोपवावं आणि पायाखाली उशी ठेवून पाय थोडे उंच करावेत. यामुळे मेंदूकडे रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते.

यासोबतच शरीरात पाण्याची कमतरता होता कामा नये. कधी-कधी डिहायड्रेशनमुळेही हार्ट रेट अनियमित होऊ शकतो. अशा वेळी ओआरएस किंवा नारळ पाणी पिणं फायदेशीर ठरू शकतं.

डॉक्टरांचा सल्ला असा आहे की, नियमित औषधं घेत असाल तर हार्ट रेटमध्ये बदल जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांना कळवावं. त्याचप्रमाणे कॅफेन, तंबाखू आणि मद्यपान करणं टाळावं.

Low Heart Rate
Foods That Harm Your Lungs: हे पदार्थ खाताय? सावध राहा, फुफ्फुसांवर होऊ शकतो गंभीर परिणाम

जीवनशैलीत बदल करणं गरजेचं

दीर्घकालीन बचावासाठी जीवनशैलीत बदल करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. नियमित व्यायाम, जसं की, चालणं किंवा योगा या हृदय मजबूत ठेवण्यास मदत करतात. आहारात मीठ आणि चरबीचं प्रमाण कमी ठेवणं तसंच फायबरयुक्त अन्न घेणं हृदयासाठी लाभदायक ठरतं.

Low Heart Rate
Fast lifestyle: तुम्हीही सतत घाईत असता? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम, तज्ज्ञांच इशारा

जर हार्ट रेट सातत्याने कमी राहत असेल आणि त्यासोबत शुद्ध हरपत असेल किंवा छातीत जडपणा जाणवत असेल तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यावश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com