5G Smartphone : भारतात कमी किमतीत स्मार्टफोन खरेदी करणारे ग्राहक अधिक आहेत. सध्या स्मार्टफोनची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या अनेकांचा कल हा 5G फोनकडे असल्यामुळे कंपन्या देखील कमी किमतीत मोबाईल फोन लॉन्च करत आहे.
जर तुम्हालाही खिशाला परवडणारा 5G स्मार्टफोन हवा असेल तर १५ हजारात या कंपनीचे मोबाईल फोन खरेदी करु शकता. यामध्ये तुम्हाला Samsung, Redmi, Realme आणि iQOO सारख्या स्मार्टफोन ब्रँड मिळू शकतात. यात Samsung Galaxy M14 5G, Realme Narzo N53 5G आणि iQOO Z6 Lite 5G यांचा समावेश आहे.
1. Samsung Galaxy M14 5G
Samsung Galaxy M14 5G हा बजेट स्मार्टफोन (Smartphone) आहे. यामध्ये 90Hz LCD डिस्प्ले आहे, जो स्मूथ स्क्रोलिंग देतो. प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर यात Exynos 1330 चिपसेट आहे. यामध्ये ते बॅटरी देखील चांगल्या प्रकारे मिळते. गेमिंग (Gaming) प्रेमीसाठी हा फोन चांगला आहे.
2. Realme Narzo N53 5G
Realme Narzo N53 5G हा फोन एकदम स्लीम व गुळगुळीत स्टायलने डिझाईन केली आहे. याचा वापर करताना iPhone 14 Pro ची आठवण करून देईल. Narzo N53 हा गेमिंग पॉवरहाऊस नसला तरी यावर आपल्याला सहज गेम खेळता येऊ शकतो. Realme Narzo N53 5G हा Rs 15,000 च्या अंतर्गत सर्वात स्वस्त असा स्मार्टफोन आहे.
3. iQOO Z6 Lite 5G
iQOO Z6 Lite मध्ये चिपसेट, स्नॅपड्रॅगन 4 Gen 1 प्रोसेसर आहे. या फोनमध्ये सीमलेस 120Hz LCD डिस्प्ले देखील आहे. यामध्ये तुम्हाला 5,000mAh बॅटरी (Battery) आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. 50MP ड्युअल-रियर कॅमेरा सेटअप, उच्च रिफ्रेश रेट डिस्प्ले, जलद चार्जिंग बॅटरी आणि प्रगत कॅमेरा सेटअप उपलब्ध आहेत.
4. Redmi Note 12 5G
तुम्ही फक्त Rs 14,999 मध्ये Redmi Note 12 5G खरेदी करू शकता. Redmi Note 12 मध्ये तुम्हाला 120Hz AMOLED स्क्रीन, 5G कनेक्टिव्हिटी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.