Lemon Water: लिंंबू पाणी पिण्याची योग्य वेळ आणि फायदे काय? जाणून घ्या

When To Drink Lemon Water in Summer Season: उन्हाळ्यात लिंबू पाणी हे सर्वांनाच आवडते. कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी लोक अनेकदा लिंबू पाणी पिणे पसंत करतात. पण तुम्हाला माहिती आहे का की लिंबू पाणी पिण्याची एक योग्य वेळ असते. जाणून घ्या.
Lemon Water
Lemon Waterfreepik
Published On

उन्हाळा सुरू झाला आहे आणि तापमान झपाट्याने वाढत आहे. या कडक उन्हात लिंबू पाणी अनेकांना आरामदायी वाटते. लिंबू पाणी हे असे पेय आहे जे केवळ तहान भागवत नाही तर आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. आणि डिहायड्रेशन पासून वाचवण्यास मदत करतात. म्हणूनच उन्हाळ्यात लिंबू पाणीचे सेवन केले पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे का लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती आहे, जाणून घ्या.

लिंबू पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?

सकाळी

लिंबू पाणी पिण्यासाठी सकाळची वेळ सर्वोत्तम आहे. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यात लिंबू आणि मध मिसळून प्यायल्याने पचनसंस्था सक्रिय होते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करते आणि पचनाची गती वाढवते. रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने वजन देखील कमी होण्यास मदत होते.

Lemon Water
Mumbai Tourist Spots: ठाणे-मुंबईपासून हाकेच्या अंतरावर वसलयं स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, उन्हाळ्यात येथे भेट द्याच...

जेवणाच्या ३० मिनिटे आधी

जेवणापूर्वी लिंबू पाणी प्यायल्यास शरीरातील पाचक एंजाइम सक्रिय होते. आणि अन्नाचे पचन चांगले होते. त्यामुळे अपचना सारखी समस्या दूर होते.

व्यायाम केल्यानंतर

व्यायाम केल्यानंतर किंवा उन्हात काम केल्यानंतर लिंबू पाणी प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची कमतरता भरून निघते. तसेच यामुळे थकवा दूर होतो. आणि उर्जावान वाटते.

दुपारी

उन्हाळ्यात दिवसा लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेटेड राहते आणि उष्माघाताचा धोका कमी होतो.

लिंबू पाणी पिण्याचे फायदे कोणते?

लिंबूमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचा उजळण्यास तसेच डाग आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात.

लिंबूमध्ये असलेले सायट्रिक अॅसिड पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, अॅसिडिटी आणि पोटफुगीपासून आराम देते.

व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले लिंबू पाणी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते, त्यामुळे सर्दी, खोकला आणि संसर्गाचा धोका कमी होतो.

लिंबू पाणी यकृत स्वच्छ करते आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि चमकदार होते.

उन्हाळ्यात, घामामुळे शरीरातील पाणी आणि मिनरल्स कमी होतात. लिंबू पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते आणि थकवा कमी होतो.

Lemon Water
Mango Chutney: जेवणासोबत तोंडी लावायला १० मिनिटांत घरीच बनवा, कच्च्या कैरीची चटपटीत चटणी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com