ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
या कडाक्याच्या उन्हात तुम्हालाही वनडे ट्रिपसाठी थंड हवेच्या ठिकाणी जायचं असेल तर माळशेज घाटपेक्षा दुसरी जागा असूचं शकत नाही.
या हिल स्टेशनवर तुम्हाला मनमोहक नैसर्गिक दृश्ये अनुभवायला मिळेल.
माळशेज घाट आपल्या नैसर्गिक सुंदरतेसाठी प्रसिद्ध आहे. येथे हजारोच्या संख्येने पर्यटक फिरण्यासाठी येतात.
माळशेज घाटाजवळ तुम्ही अजोबा किल्ला, पिंपळगाव जोगा धरण, आणि सुंदर धबधब्यांचा आनंद घेऊ शकता.
पावसाळ्यात येथील हिरवीगार डोंगर आणि ओसंडून वाहणाऱ्या धबधब्यांची नयनरम्य दृश्ये पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
उन्हाळ्यात तुम्ही देखील या थंड हवेच्या ठिकाणी तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालू शकता. येथील अद्भुत दृश्ये आणि वातावरण तुमची ट्रिप अविस्मरणीय करेल.
बोरीवलीपासून माळशेज घाट १५१ किलोमीर अंतरावर आहे.