ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात आईस्क्रीम आणि कुल्फी खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो. पण मधुमेहाचे रुग्ण गोड पदार्थ खाण्यापूर्वी अनेक वेळा विचार करतात.
तुम्हीही या उन्हाळ्यात टेस्टी आणि हेल्दी शुगर फ्रि कुल्फी फक्त अर्ध्या तासात बनवू शकता. ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.
फुल क्रिम दूध, काजू, बदाम, वेलची, गुळ आणि केसर.
सर्वप्रथम काजू आणि बदाम मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. आणि वेलचीचे दाणे देखील वेगळे करुन घ्या.
गुळाचे बारीक तुकडे करुन मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
एका भांड्यात दूध गरम करुन घ्या. दूधामध्ये गुळ, ड्राय फ्रुट्स आणि वेलची पावडर आणि केसर घाला. दूध घट्ट होईपर्यंत उकळून घ्या.
दूध थंड करुन घ्या. थंड झाल्यावर कुल्फी ट्रे मध्ये टाकून सेट करण्यासाठी ७ ते ८ तासासाठी फ्रिजरमध्ये ठेवा.
शुगर फ्रि कुल्फी तयार आहे. या कडाक्याच्या उन्हात तुमच्या कुटुंबासोबत हेल्दी आणि टेस्टी कुल्फीचा आनंद घ्या.