Elephant: हत्ती कोणाला घाबरतो? माहितीये का

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हत्ती आणि मुंगी

तुम्ही महाकाय हत्ती आणि मुंगीची कहाणी ऐकली असेलच. पण हत्ती मुंगीला घाबरत नाही तर या लहान प्राणीला घाबरतो.

Elephant | canva

मधमाशी

हत्ती मुंगी नाही तर मधमाशीला घाबरतो. काही संशोधनातून असे दिसून आले आहे की, मधमाशांचा आवाज ऐकताच हत्ती अंतर राखतात.

Elephant | freepik

मधमाशांचा हल्ला

मधमाशा थव्याने हल्ला करतात, त्यांनी चावल्यास तीव्र वेदना होतात. हत्तीची त्वचा जाड असते, परंतु त्याची सोंड आणि डोळे यासारखे भाग मधमाश्यांच्या हल्ल्यापासून वाचू शकत नाहीत.

Elephant | freepik

हत्तीची सोंड

हत्तीची सोंड अत्यंत संवेदनशील असते आणि ती त्याच्या श्वासोच्छवासाचा मुख्य स्रोत असते. जर मधमाशा सोंडेवर हल्ला करतात तर वेदना आणि सूज यामुळे हत्तीला श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

Elephant | freepik

मधमाशांचा आवाज

मधमाशांच्या मोठ्या आवाजामुळे हत्ती अस्वस्थ होतात. या कारणांमुळे हत्ती मधमाश्यांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.

Elephant | freepik

दक्षिण अफ्रिका

तज्ञांच्या मते, आफ्रिका आणि आशियातील जंगली हत्तीची अनेकदा मधमाशांच्या पोळ्यांशी न कळता टक्कर लागते. पण एकदा त्यांच्यावर मधमाशांनी हल्ला केला की त्यांना ते समजते.

Elephant | freepik

आवाज

काही संशोधनातून असे दिसून आले आहे की जंगलातील हत्ती मधमाशांचा भुनभुनन्याचा आवाज ऐकताच पळून जातात.

Elephant | freepik

शेतकरी

अनेक ठिकाणी शेतकरी हत्तींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मधमाशांचा वापर करतात.

Elephant | freepik

NEXT: अरे बापरे! या ठिकाणी मुली मृतदेहासोबतही करतात लग्न

Marriage | yandex
येथे क्लिक करा