ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळ्यात अनेक जण कच्ची कैरीपासून वेगवेगळे पदार्थ बनवतात. पण तुम्ही कधी कच्ची कैरी आणि पुदिनाची चटणी बनवली आहे का, मग ही रेसिपी नक्की ट्राय करा.
उन्हाळ्यात पुदिनाही सहज बाजारात मिळतो. पुदिनाचे सेवन केल्याने पोटात थंडावा राहतो. तसेच अपचन सारख्या अनेक सम्यापासून आराम मिळतो.
उन्हाळ्यात तुम्हीही कच्ची कैरी आणि पुदिनाची चटपटीत चटणी घरी बनवू शकता.
कैरी आणि पुदिना स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. कैरीला बारीक तुकड्यांमध्ये कापून घ्या.
मिक्सरमध्ये कच्ची कैरी, पुदिना, हिरवी मिरची, मीठ, लसूण घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
चटणी मिक्सरमधून वाटीमध्ये काढून घ्या. यामध्ये स्वादानुसार, मीठ आणि लाल तिखट घालून मिक्स करा.
कैरी पुदिनाची चटपटीत चटणी तयार आहे. जेवणासोबत या चटणीचा आनंद घ्या.