Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

Late night sleep: उशिरा झोपणे, नाईट शिफ्ट आणि अनियमित जीवनशैलीमुळे शरीराची नैसर्गिक लय बिघडते. यामुळे मानसिक ताण, थकवा, डिप्रेशन आणि अनेक आजारांचा धोका वाढतो. योग्य वेळेत झोप घेतल्यास शरीर आणि मेंदू निरोगी राहण्यास मदत होते.
Late night sleep
Late night sleepsaam tv
Published On

आजच्या काळात विज्ञान, कॉम्प्युटर आणि इंटरनेटमुळे जग खूप बदललं आहे. त्यामुळे लोकांची जीवनशैली पूर्णपणे बदललीये. अनेक जण दिवसरात्र काम करतात. कॉल सेंटरमध्ये नाईट शिफ्ट करणारे लोक असोत किंवा रात्री उशिरापर्यंत जागणारे तरुण अशा सवयींचा शरीरावर मोठा परिणाम होताना दिसतो. काही लोकांच्या मते, यामुळे मानसिक ताण, डिप्रेशन आणि विविध शारीरिक समस्या वाढतायत. नैसर्गिक जीवनशैलीत दिवस कामासाठी आणि रात्र विश्रांतीसाठी मानली जाते.

झोप म्हणजे काय आणि ती का येते?

झोप म्हणजे शरीराची नैसर्गिक विश्रांतीची अवस्था. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिल्यास, दिवसभर काम केल्यानंतर मेंदू आणि शरीर थकतं आणि त्यांना पुन्हा ऊर्जा मिळावी म्हणून झोप आवश्यक असते. झोपेमुळे शरीराची दुरुस्ती प्रक्रिया सुरू होते. यामुळे मेंदूला विश्रांती मिळते आणि पुढच्या दिवसासाठी ऊर्जा साठवली जाते.

Late night sleep
Early kidney cancer: शरीरात दिसणारे हे ५ बदल सामान्य समजताय? किडनी कॅन्सरची सुरुवातीची धोकादायक चिन्हं असू शकतात

अनेक पारंपरिक आणि आध्यात्मिक विचारांनुसार, झोप ही शरीरातील ऊर्जेचा भाग मानली जाते. शरीरातील ऊर्जा कमी झाली की मेंदूला विश्रांतीचा संकेत मिळतो आणि माणूस झोपतो.

रात्री जागल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की, रात्री जागरण केल्याने शरीराची नैसर्गिक लय बिघडते. काही लोक सांगतात की सतत नाईट शिफ्ट किंवा रात्री जागरणामुळे शुगर, उच्च रक्तदाब, हृदयाशी संबंधित समस्या, किडनीचे त्रास, डिप्रेशन, डोकेदुखी, स्मरणशक्ती कमी होणं आणि शरीर लवकर थकणं अशा समस्या वाढू शकतात.

रात्री जागरण का घातक मानलं जातं?

जास्त काम केल्यानंतर शरीराला नैसर्गिकरित्या झोपेची गरज भासते. झोप शरीराला “रीसेट मोड” मध्ये टाकतं, जिथे शरीराची ऊर्जा पुन्हा भरून निघते. जर झोप अपुरी राहिली तर शरीर सतत तणावाखाली राहतं.

Late night sleep
Bad cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठलीये? हे 6 डिंक्स खेचून बाहेर काढतील वाईट कोलेस्ट्रॉल

काही तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, झोप न घेतल्यास शरीरातील ऊर्जा कमी होत जाते आणि त्यामुळे अवयवांवर भार वाढतो. यामुळे थकवा, अशक्तपणा आणि दीर्घकाळात आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

झोपेची योग्य वेळ कोणता मानला जातो?

रात्री लवकर झोपणं आणि पहाटे उठणं शरीरासाठी चांगलं मानलं जातं. विशेषतः रात्री 10 ते सकाळी 4 या वेळेत गाढ झोप घेतल्यास शरीराला अधिक फायदा होतो असे अनेक लोक सांगतात. या वेळेत शरीराची दुरुस्ती प्रक्रिया एक्टिव्ह असते आणि मेंदूला योग्य विश्रांती मिळते असं मानलं जातं.

Late night sleep
Artery plaque: कोलेस्ट्रॉलमुळे धमन्यांमध्ये साचलेली चरबी कमी करायचीये? डॉक्टरांनी सांगितले 6 सोपे उपाय

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com