Bad cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठलीये? हे 6 डिंक्स खेचून बाहेर काढतील वाईट कोलेस्ट्रॉल

Surabhi Jayashree Jagdish

कोलेस्ट्रॉल

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण जास्त झाल्यास हृदयावर परिणाम होऊ शकतो. योग्य आहार आणि ड्रिंक्स निवडल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास मदत होते. काही नैसर्गिक ड्रिंक्स शरीरातील फॅट कमी करून हृदय निरोगी ठेवतात. हे ड्रिंक्स कोणते आहेत ते पाहूयात.

LDL Cholesterol | saam tv

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन्स नावाचं अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतं. जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. हे अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमध्ये फॅट साचू देत नाहीत आणि हृदय निरोगी ठेवतात.

Heart Health | saam tv

लिंबू पाणी

लिंबू पाणी व्हिटॅमिन C आणि फ्लेवोनॉइड्सने समृद्ध असते जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. हे पेय शरीराला नैसर्गिकरित्या डिटॉक्स करून विषारी घटक बाहेर टाकते.

Lemon Water | saam tv

हर्बल टी

हर्बल टीमध्ये कॅफिन नसते आणि त्यामुळे ते शरीरासाठी हलकं आणि सुरक्षित पेय मानलं जातं. कॅमोमाइल, पेपरमिंट आणि हिबिस्कस सारखे प्रकार कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात.

Herbal Tea | saam tv

स्पार्कलिंग वॉटर विथ सिट्रस

स्पार्कलिंग वॉटरमध्ये लिंबू, लिंबूवर्गीय फळांचा रस घातल्यास ते आरोग्यदायी ड्रिंक बनते. या पेयामध्ये साखर नसल्यामुळे ते कॅलरी वाढवत नाही आणि शरीर हायड्रेट ठेवतं.

Vegetable Juice | saam tv

व्हेजिटेबल ज्यूस

गाजर, बीट यांसारख्या भाज्यांचा रस शरीराला आवश्यक जीवनसत्त्वं आणि मिनरल्स पुरवतो. हा रस अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो. नियमित सेवन केल्याने शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते.

Green Smoothie | saam tv

ग्रीन स्मूदी

पालक, केल यांसारख्या हिरव्या पालेभाज्या आणि सफरचंद किंवा बेरी यांचं मिश्रण करून ग्रीन स्मूदी तयार केली जाते. यात फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

Fat Reduction | saam tv

Heart attack: हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीराच्या या ३ भागांत होतात वेदना

heart attack prevention | saam tv
येथे क्लिक करा