Walking benefits: फक्त ३० दिवस दररोज १०,००० पावलं पायी चाला; शरीरात दिसतील ७ चमत्कारीक फायदे

Health benefits of walking 10,000 steps: दररोज १० हजार पावलं चालल्याने हृदय आरोग्य सुधारतं, वजन कमी होण्यास मदत होते, मानसिक ताण कमी होतो. संशोधनानुसार, ही सवय एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
Heart Health Exercise Time
Walking Health Benefitsgoogle
Published On

आपण फिट आणि फाईन असावं असं कोणाला वाटत नाही... निरोगी राहण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न करतो. मात्र यासाठी एक सोपा उपाय तो म्हणजे पायी चालणं. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, फिटनेस जपण्यासाठी दहा हजार पावलं चालणं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. मात्र खरंच तुम्ही कधी विचार केलाय का की, दहा हजार पावलं चालल्याने तुम्हाला फायदा होतो का? जपानच्या एका पेडोमीटरच्या सहाय्याने संशोधकांच्या हे लक्षात आलं की, दहा हजार पावलं चालल्याने तुमच्या आरोग्याला खरंच फायदा होतो.

ब्राझिलियन जर्नल ऑफ फिजिकल थेरपीमध्ये या संदर्भातील संशोधन केलेलं आर्टिकल पब्लिश करण्यात आलं. यामध्ये ३० जणांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी तब्बल १२ आठवडे १० हजार पावलं नियमितपणे चालली होती. यानंतर त्यांच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून आले.

यामध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींमध्ये चिंता, डिप्रेशन, राग, गोंधळ यांच्यात सुधारणा दिसून आली. अभ्यास सुरू करण्यापूर्वी या व्यक्तींमध्ये या समस्या मोठ्या प्रमाणात दिसून आल्या होत्या. जर चालण्याचा योग्य तो फायदा हवा असेल तर चालण्यामध्ये सातत्य राखणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

Heart Health Exercise Time
Heart health warning signs: फक्त छातीत दुखणं नाही तर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे

दररोज दहा हजार पावलं चालण्याचे फायदे

हृदयाचं आरोग्य सुधारतं

जर तुम्ही दररोज दहा हजार पावलं चालत असाल तर ते तुमच्या हृदयासाठी फायदेशीर आहे. ज्यामुळे रक्ताभिसरण, हार्ट रेट यांच्यात सुधारणा होते. त्याचप्रमाणे हृदयाच्या स्नायूंना देखील बळकटी मिळते. संशोधनातून असं स्पष्ट झालंय की, दहा हजार पावलं चालल्यानंतर हार्ट अटॅक येण्याचा धोका देखील कमी होतो.

वजन नियंत्रणास मदत

ज्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे तिला डॉक्टरही पायी चालण्याचा सल्ला देतात. पायी चालल्याने कॅलरीज बर्न होतात आणि तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. १०,००० पावलं चालल्याने तुमच्या शरीरातील जवळपास ३००-५०० कॅलरीज बर्न होतात. जर यामध्ये तुम्ही सातत्य ठेवलं तर महिन्याला १-२ किलो वजन कमी होऊ शकतं.

मानसिक आरोग्य सुधारतं

पायी चालल्याने एकंदरीत तुमचा मूड सुधारतो. यामुळे ताणतणाव, चिंता आणि डिप्रेशन कमी होण्यास मदत होते. परिणामी तुमचं मानसिक आरोग्यही उत्तम राहतं.

स्नायू आणि हाडांसाठी फायदेशीर

दररोज पायी चालणं हे तुमच्या स्नायूंसाठी फायदेशीर ठरतं. ज्या व्यक्तींना ऑस्टिओपोरोसिसचा त्रास आहे त्यांना डॉक्टर चालण्याचा सल्ला देतात. यामुळे तुमच्या हाडांची घनता (Bone density) चांगली राहते.

Heart Health Exercise Time
Summer heat children: उन्हाचा तडाखा वाढला! मुलांच्या शरीरात दिसणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

ब्लड शुगर नियंत्रणात राहते

दररोज पायी चालल्याने तुमची इन्सुलिन संवेदनशीलता आणि ग्लुकोज नियंत्रणात राहते. यामुळे जेवणानंतर ब्लड शुगर वाढण्याचा धोका कमी होतो.

झोपेची गुणवत्ता

जर तुम्ही दर दिवशी एखादी ॲक्टिव्हिटी करत असाल तर त्याचा चांगला परिणाम तुमच्या झोपेवर होतो. त्यामुळे जर तुम्ही दररोज सातत्याने चालत असाल तर तुम्हाला शांत आणि चांगली झोप लागू शकते.

Heart Health Exercise Time
Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

रोग प्रतिकारकशक्ती वाढते

कोणत्याही आजाराशी लढण्यासाठी तुम्हाला रोग प्रतिकारकशक्ती मदत करते. कोणत्याही प्रकारचा व्यायाम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो. त्यामुळे आजारपण किंवा इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com