Summer heat children: उन्हाचा तडाखा वाढला! मुलांच्या शरीरात दिसणाऱ्या या बदलांकडे दुर्लक्ष करू नका

Dehydration in kids: वाढत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. डिहायड्रेशन, पचनाच्या समस्या आणि वागण्यात बदल दिसू शकतात. वेळेवर पाणी, हलके कपडे आणि उन्हापासून बचाव केल्यास मुलांना सुरक्षित ठेवता येते.
Summer heat children
Summer heat childrenSAAM TV
Published On

एप्रिलचा महिना सुरु असून मे महिन्यात उकाडा वाढणार आहे. दुपारची उकाड्याची सवय आपल्याला असतेच, पण यंदा परिस्थिती थोडी वेगळीच दिसतेय. आधी दुपारीही खेळायला आरामदायक वाटणारी शाळेची मैदानं आता सकाळीच तापलेली जाणवत आहेत. या बदलत्या उष्णतेचा सर्वाधिक परिणाम होत आहे तो लहान मुलांवर.

लहान मुलांचं शरीर अजून वाढीच्या टप्प्यात असल्यामुळे त्यांना इतक्या तीव्र तापमानाचा सामना करणं कठीण जातं. त्यामुळे त्यांच्या शरीरात आणि वागण्यात होणारे बदल वेळेवर ओळखणं खूप गरजेचं ठरतं. हे बदल लक्षात घेतले तर पालकांना मुलांच्या आरोग्याची काळजी घेणं अधिक सोपं होऊ शकतं.

Summer heat children
Weight loss injection: लठ्ठपणावर मात करणं आता झालं स्वस्त, वजन घटवणारं औषध ₹900 पासून उपलब्ध

नारायणा हेल्थ एसआरसीसी चिल्ड्रन्स हॉस्पिटलच्या कन्सल्टंट पीडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी आणि हेपॅटोलॉजी तज्ज्ञ डॉ. आदित्य सतीश कुलकर्णी यांच्या मते, उष्णतेमुळे होणाऱ्या डिहायड्रेशनचा परिणाम फक्त त्वचेवर किंवा उर्जेवरच होत नाही तर तो थेट पचनसंस्थेवरही होतो. त्यामुळे मुलांना बद्धकोष्ठता, भूक न लागणं किंवा पोटदुखी यांसारख्या तक्रारी जाणवू शकतात.

याशिवाय, मुलांच्या वागण्यातही बदल दिसू शकतो. काही मुलं खाणं टाळतात, कमी एक्टिव्ह होतात किंवा अगदी पटकन चिडचिड करू लागतात. हे सगळे संकेत शरीरावर उष्णतेचा ताण येत असल्याचं दर्शवतात. ज्या मुलांना आधीपासून दमा किंवा ॲसिड रिफ्लक्ससारख्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. उष्णता आणि डिहाड्रेशनमुळे त्यांची लक्षणं वाढू शकतात.

उन्हाळ्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे?

तज्ज्ञांच्या मते, काही साध्या सवयी अंगीकारल्या तर मुलांना उष्णतेपासून बर्‍याच अंशी सुरक्षित ठेवता येऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुलांना वेळोवेळी पाणी पाजणं, त्यांना तहान लागेपर्यंत थांबू न देता नियमित पाणी देणं गरजेचं आहे. तसंच, हलके आणि हवा खेळती राहील असे सुती किंवा लिननचे कपडे घालणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

Summer heat children
Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत उन्हाचा तडाखा जास्त असतो. त्यामुळे या काळात मुलांना बाहेर खेळू देणं टाळावं आणि घरातील खेळांकडे त्यांना वळवावं. जर मुलं बाहेर खेळत असतील, तर त्यांना सावली मिळेल आणि पाण्याची सोय असेल याची खात्री करणं आवश्यक आहे.

Summer heat children
Unmarried health risks: अविवाहितांना कॅन्सरचा धोका ८५% जास्त; रिसर्चमधून धक्कादायक माहिती समोर

मुलांमध्ये थकवा जाणवणं, ओठ कोरडे पडणं किंवा लघवी कमी होणं ही डिहायड्रेशनची लक्षणं असू शकतात. अशा संकेतांकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर हवामानातील बदलांशी जुळवून घेण्यासाठी मुलांना हळूहळू तयार करणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com