Breast cancer India: महिलांनो वेळीच सावध व्हा! चुकीच्या सवयींमुळे 30 वयात वाढतोय ब्रेस्ट कॅन्सरचा धोका

why breast cancer is increasing in young women India: सध्या ३० ते ४० वयोगटातील महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण वाढताना दिसत आहे. बदलती जीवनशैली, ताणतणाव, चुकीचा आहार आणि हार्मोन्समधील असंतुलन ही यामागील प्रमुख कारणं मानली जात आहेत.
World Cancer Day 2026
Breast Cancer Treatment Indiagoogle
Published On

आजकाल आरोग्याच्या बाबतीत एक चिंताजनक बाब समोर येतेय. पूर्वी 40 ते 50 वयोगटातील महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसणारा ब्रेस्ट कॅन्सर आता 30 ते 40 वयोगटातील महिलांमध्येही वेगाने वाढताना दिसतोय. ही बाब तज्ज्ञांसाठीही चिंतेचा विषय ठरतेय.

एका वेबसाईटला माहिती देताना डॉ. ज्योति वाधवा यांच्या मते, भारतात कमी वयात ब्रेस्ट कॅन्सर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. बदलती जीवनशैली, सततचा ताण, हार्मोन्समधील असंतुलन, उशिरा लग्न, चुकीचा आहार आणि जागरूकतेचा अभाव ही प्रमुख कारणं समोर येतायत.

World Cancer Day 2026
Walking Warning Signs: चालताना पायात जाणवतात 'या' समस्या, वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी सांगितली हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे

बदलती जीवनशैली आणि आहाराचा परिणाम

आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक महिला प्रोसेस्ड फूड, जंक फूड आणि जास्त कॅलरी असलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खातात. अशा आहारामुळे वजन वाढणं आणि हार्मोन्समध्ये बिघाड होण्याचा धोका वाढतो. हे दोन्ही घटक ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.

ताणतणावही मोठं कारण

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दीर्घकाळ तणावात राहिल्यास शरीरातील कोर्टिसोलचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि कॅन्सरसारख्या आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे तणाव नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

मद्यपान आणि धूम्रपानाचा परिणाम

अल्कोहोलचं सेवन आणि धूम्रपान यामुळे शरीरात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो आणि हार्मोन्समध्ये बदल होतात. यामुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक वाढू शकतो, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.

धोका कमी करण्यासाठी काय करावं?

डॉक्टरांच्या मते, काही चांगल्या सवयी जोपासल्यास हा धोका कमी करता येऊ शकतो.

नियमित व्यायाम आवश्यक

दररोज व्यायाम केल्याने शरीरातील हार्मोन्स संतुलित राहतात आणि कॅन्सरचा धोका कमी होण्यास मदत होते.

World Cancer Day 2026
Cancer Symptoms: तरूणांनो शरीरात ही लक्षणं दिसतायत तर व्हा सावध; शरीरात सायलेंट कॅन्सर करतोय घर

संतुलित आहार घ्या

दररोजच्या आहारात फळे, भाज्या आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. संतुलित आहारामुळे शरीर निरोगी राहते.

मद्यपान आणि धूम्रपान टाळा

आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मद्यपान आणि धूम्रपान यापासून दूर राहणं आवश्यक आहे. या सवयी टाळल्यास कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.

World Cancer Day 2026
Liver tumor: लिव्हरमध्ये गाठ तयार झाल्यावर शरीर कसं सांगतं? ही महत्त्वाची 5 लक्षणं जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com