Walking Warning Signs: चालताना पायात जाणवतात 'या' समस्या, वेळीच व्हा सावध, तज्ज्ञांनी सांगितली हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे

High Cholesterol Symptoms: चालताना दम लागणे, पायात गोळे येणे, जडपणा किंवा हातपाय थंड पडणे ही हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणे असू शकतात. वेळेत तपासणी करून हृदयविकाराचा धोका टाळा.
High cholesterol symptoms while walking
Signs of blocked arteries in legsgoogle
Published On

सध्याची जीवनशैली इतकी बदलली आहे की, लोकांना घराबाहेर पडायला कंटाळा येतो. लोक कामानिमित्त घराबाहेर पडतात. पण इतर मिळालेला वेळ त्यांना घरातच बसून राहायला आवडतं. मोबाइल किंवा स्मार्ट टिव्ही पाहून लोक त्यांचा संपूर्ण वेळ घरातच राहतात. पण यासगळ्यामुळे तुम्हाला कमी कोलेस्टेरॉल, हृदयविकार, स्ट्रोकसारख्या आजारांना बळी पडावं लागू शकतं. यामागचं नेमकं कारण डॉक्टरांनी स्पष्ट केलं आहे.

सध्या लोकांना शारीरिक श्रम असलेली करावी लागत नाहीत. त्यामुळे तासंतास बसून लोकं त्यांची कामं करतात. त्यामुळे त्यांना व्यायाम करणं गरजेचं असतं. त्यातल्या त्यात चालणं हा पर्याय सगळ्यांसाठीच सोयीचा ठरतो. कारण उच्च एलडीएल कोलेस्टेरॉल ही एक सायलेंट समस्या आहे. कारण सुरुवातीला या आजाराची स्पष्ट लक्षणे फारशी स्पष्ट दिसत नाहीत.

कधीकधी चालताना काही बदल जाणवतात. उदाहरणार्थ, चालताना अचानक धापा लागतात. ही सामान्य गोष्ट नाही. जर थोडं चालल्यानंतरच दम लागायला लागला, तर याचा अर्थ हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. कोलेस्टेरॉलमुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात आणि ऑक्सिजन कमी होतं.

तसेच चालताना पायांमध्ये सतत गोळे येतात, दुखतात किंवा जडपणा जाणवतो हे सुद्धा खूप गंभीर संकेत असू शकतात. यामुळे पायांच्या रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होतो आणि रक्तपुरवठा कमी होतो. काही व्यक्तींना चालल्यानंतर हात-पाय थंड पडल्यासारखं वाटतात. हे रक्ताभिसरण नीट न होण्याचं लक्षण असू शकतं. त्यामुळे हात-पाय गार पडल्यासारखं वाटतं. म्हणूनच जर चालताना अशा प्रकारची लक्षणे जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लिपिड प्रोफाइलसारखी तपासणी करून घ्या. योग्य वेळी काळजी घेतल्यावर गंभीर आजार टाळता येऊ शकतो.

High cholesterol symptoms while walking
High BP: कामाच्या ठिकाणी हाय ब्लड प्रेशर कसा नियंत्रित ठेवायचा? डॉक्टरांनी दिले महत्त्वाचे सल्ले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com