

सध्याच्या धकाधकीच्या जीवनातून स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. सणावाराला सुद्धा घरची कामे पूजा आटपून कामासाठी पळावं लागतं. अनेकजण रोजच्या लोकलच्या प्रवासाला कंटाळतात, त्यानंतर ट्रॅफिकचं टेन्शन सुद्धा येतं. त्यात आता उन्हाळा वाढत चालला आहे. त्याने आजूनच चिडचिड होते. या कामाच्या गडबडीत स्वत:ची दुखणी आपण नीट पाहतच नाहीत. त्यामुळेच तुमच्या ह्रदयावर परिणाम होतो आणि तुम्हाला कमी वयातच हार्ट अटॅकच्या समस्येला सामोरं जावं लागतं.
सध्याच्या कामामुळे ताण सुद्धा वाढतो. याने तुमच्या Hypertension म्हणजेच उच्च रक्तदाब वाढतं. हा आजार Cardiovascular Diseases म्हणजेच हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसाठी प्रमुख कारण मानला जातो. त्यामुळे वेळेत काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. पण तुम्ही जर कामात असाल आणि तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल तर तुम्ही ही माहिती वाचून तुमच्यात काही बदल करणं गरजेचं आहे. हे बदल जर वेळीच केले नाहीत तर तुम्हालाही हार्ट अटॅकसारख्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं.
ऑफिसमध्ये तुम्ही बराच बसून काम करता, कमी हालचाल करता यामुळे रक्तदाब नियंत्रणाबाहेर जातो. तासंतास बसून राहिल्यामुळे शरीराची मेटाबॉलिझमची प्रक्रिया सुद्धा मंदावते आणि वजन वाढतं. यालाच फॅट म्हणून तुम्ही दुर्लक्षित करता. हीच चरबी उच्च रक्तदाब वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतं.
त्यामुळे कामाच्या ठिकाणी काही सोप्या सवयी फॉलो केल्याने रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो. दररोज किमान 30 मिनिटं चाला किंवा सायकलिंगसारखा व्यायाम केल्यावर हार्टचं कार्य सुधारतं. यासोबतच, काही मिनिटं ध्यान किंवा श्वसनाचे व्यायाम करा. त्याने मानसिक ताण कमी होतो आणि रक्तदाब नॉर्मल राहतो.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.