Lifestyle habits: महिलांनो...तुम्हाला या ५ सवयी असतील तर अकाली दिसू शकता वृद्ध!

Surabhi Jayashree Jagdish

जीवनशैली

मानवी शरीराच्या आरोग्यावर झोप, आहार, मानसिक स्थिती आणि जीवनशैली यांचा थेट परिणाम होतो. काही सवयींमुळे त्वचेवर लवकर वृद्धत्वाची चिन्हं दिसू लागतात.

Skin aging

महिलांच्या सवयी

त्यामुळे महिलांच्या दैनंदिन सवयींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. योग्य जीवनशैली नसेल तर तुम्ही अकाली वृद्ध दिसण्याची शक्यता असते. यामध्ये कोणत्या सवयींचा समावेश आहे ते पाहूयात

Premature aging

कमी झोप घेणाऱ्या महिला

झोप कमी घेतल्यामुळे शरीराला योग्य विश्रांती मिळत नाही आणि त्वचा स्वतःची दुरूस्ती करू शकत नाही. यामुळे चेहऱ्यावर डार्क सर्कल आणि थकवा दिसू लागतो. दीर्घकाळ झोपेची कमतरता राहिल्यास त्वचा लवकर निस्तेज होते.

Lifestyle habits

कमी पाणी पिणाऱ्या महिला

पाणी कमी प्यायल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होतं आणि त्वचा कोरडी पडते. कोरडी त्वचा लवकर सुरकुत्या निर्माण करते. योग्य प्रमाणात पाणी न घेतल्यास शरीरातील टॉक्सन घटक बाहेर पडत नाहीत आणि त्वचेची चमक कमी होते.

Sleep deprivation

जास्त ताण

अतिरिक्त ताणामुळे शरीरात कॉर्टिसोल हार्मोन वाढतो जे त्वचेसाठी हानिकारक ठरतं. यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणं लवकर दिसू लागतात. सतत मानसिक दडपण राहिल्यास शरीराची नैसर्गिक चमक कमी होते.

Healthy lifestyle

पटकन राग येणाऱ्या महिला

ज्या महिलांना लवकर राग येतो त्यांचं हार्मोनल संतुलन बिघडण्याची शक्यता वाढते. यामुळे त्वचेवर पिंपल्स आणि इतर समस्या निर्माण होतात. रागामुळे चेहऱ्याच्या स्नायूंवर ताण येतो आणि सुरकुत्या लवकर दिसतात.

Poor sleep effects

व्यायाम न करणाऱ्या महिला

व्यायाम न केल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण कमी होतं. याचा परिणाम त्वचेवर ऑक्सिजन आणि पोषण कमी मिळण्यात होतो. त्यामुळे त्वचा निस्तेज आणि थकलेली दिसू लागते.

Lifestyle diseases

High cholesterol: नखांमध्ये हे बदल दिसले तर समजा रक्तवाहिन्यांमध्ये साचतेय चरबी

Silent Killer Disease | saam tv
येथे क्लिक करा