Surabhi Jayashree Jagdish
कोलेस्ट्रॉल वाढलं की तुमच्या शरीरात त्याची लक्षणं दिसतात. मुख्य म्हणजे नखांवर देखील ही लक्षणं दिसून येतात. यामध्ये कोणते बदल पाहायला मिळतात ते पाहूयात.
नखांवर उभ्या रेषा किंवा खाचा दिसणं हे शरीरातील एखाद्या आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉलमुळे रक्तप्रवाहावर परिणाम होऊन असे बदल दिसतात. अॅनिमिया किंवा पोषणतत्त्वांच्या कमतरतेमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
नखांवर काळ्या रेषा किंवा विचित्र रंग बदल दिसू लागल्यास दुर्लक्ष करू नका. हाय कोलेस्ट्रॉलमुळे रक्ताभिसरण कमी झाल्याने नखांचा रंग बदलू शकतो. हे शरीरातील रक्तपुरवठा नीट होत नसल्याचे संकेत मानले जातात.
कधी-कधी नखं खाली वाकलेली आणि बोटांचे टोकं फुगल्यासारखी दिसतात. याला क्लबिंग असं म्हटलं जातं आणि ते ऑक्सिजनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं. कोलेस्ट्रॉलचं असंतुलन दीर्घकाळ राहिल्यास अशी समस्या निर्माण होऊ शकते.
नखांचा रंग अचानक निळसर किंवा जांभळा दिसू लागल्यास सावध व्हा. हे शरीरात पुरेसा ऑक्सिजन न पोहोचण्याचे संकेत असू शकतात. अशा वेळी विलंब न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
हाय कोलेस्ट्रॉलमुळे नखांना योग्य पोषण आणि ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे नखं पातळ, कमजोर आणि सहज तुटू लागतात. ही समस्या सतत जाणवत असल्यास आरोग्याची तपासणी करणं गरजेचं आहे.
नखं नेहमीपेक्षा खूप हळू वाढत असतील तर तेही एक संकेत असू शकतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे नखांच्या वाढीवर परिणाम होतो. शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यास अशी समस्या दिसू शकते.