Surabhi Jayashree Jagdish
सध्या धकाधकीच्या जीवनात छोट्या संकेतांकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. असंच हृदयाशी संबंधित अनेक शरीर काही सूक्ष्म इशारे देत असतं. हे इशारे वेळेवर ओळखले तर मोठा धोका टाळता येऊ शकतो. असा महत्त्वाचा इशारा एका नव्या अहवालातून समोर आला आहे.
तज्ज्ञांनी हार्ट अटॅकची अशी काही लक्षणं सांगितली आहेत जी अनेकदा दुर्लक्षित राहतात. कार्डियोलॉजिस्टही सांगतात की, छातीत दुखणं हे हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण असलं तरी, त्याआधी शरीर अनेक शांत संकेत देत असतं.
साधं चालणं, जिने चढणं किंवा घरकाम करतानाही अचानक दम लागणं हे धोक्याचं लक्षण असू शकतं. हृदय नीट पंप करू न शकल्यास फुफ्फुसांमध्ये द्रव साचू शकतो आणि श्वास घेणं कठीण होतं.
पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही शरीरात सतत थकवा राहणं हेही गंभीर संकेतांपैकी एक आहे. शरीरातील अवयवांना योग्य प्रमाणात रक्तपुरवठा न झाल्यास असा थकवा जाणवू शकतो. हे हार्ट अटॅकचं लक्षण असू शकतं.
हृदय जोरात धडधडणं किंवा वेगाने ठोके वाढणं हे लक्षण वारंवार दिसल्यास दुर्लक्ष करू नये. अशा अनियमित ठोक्यांमुळे स्ट्रोकसारख्या गंभीर गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो.
उभं राहताना किंवा अचानक हालचाल करताना चक्कर येणं, डोळ्यांसमोर अंधारी येणं किंवा तोल जाणं हे हृदयाच्या अनियमित ठोक्यांशी संबंधित असू शकतं. हृदयाचे ठोके अनियमित झाल्यास मेंदूपर्यंत रक्तपुरवठा कमी होतो आणि अशी लक्षणं दिसू शकतात.
काहीही स्पष्ट कारण नसताना मळमळ, अपचन किंवा अचानक भूक कमी होणं हेही हृदयावर ताण असल्याचं लक्षण असू शकतं. विशेषतः महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या वेळी अशी लक्षणं दिसण्याची शक्यता अधिक असते.
हृदय जोरात धडधडणं किंवा वेगाने ठोके वाढणं हे लक्षण वारंवार दिसल्यास दुर्लक्ष करू नये. अशा अनियमित ठोक्यांमुळे स्ट्रोकसारख्या गंभीर गुंतागुंतीचा धोका वाढू शकतो.