Toyota Great 4x4 X-Pedition: टोयोटाने 'ग्रेट 4X4 एक्सपीडीशन'ला दाखवला हिरवा झेंडा, लोणावळ्यापासून गाठणार कर्नाटक

Toyota Great 4x4 X-Pedition: आज लोणावळ्याच्या निसर्गरम्य हिल स्टेशनपासून भारताच्या पश्चिम भागात टोयोटा किर्लोस्कर मोटरने 'ग्रेट 4X4 एक्सपीडीशन'ला हिरवा झेंडा दाखवला आहे.
Toyota Great 4x4 X-Pedition:
Toyota Great 4x4 X-Pedition:Saam tv

Toyota Great 4x4 X-Pedition:

आज लोणावळ्याच्या निसर्गरम्य हिल स्टेशनपासून भारताच्या पश्चिम भागात टोयोटा किर्लोस्कर मोटरने 'ग्रेट 4X4 एक्सपीडीशन'ला हिरवा झेंडा दाखवला आहे. एसयूव्ही एक्सपेरिअन्शिअल ड्राइव्हचा हा दुसरा टप्पा आहे. (Latest Marathi News)

टोयोटा किर्लोस्कर मोटरने लोकांसाठी 4x4 एक्सपेरिअन्शिअल ड्राइव्हचा पहिला उपक्रम घोषित केला होता. या ड्राइव्हस् देशव्यापी 4x4 एसयूव्ही ग्रुपशी संलग्न राहण्यासाठी डिझाइन केल्या आहेत.

Toyota Great 4x4 X-Pedition:
Hyundai I20 Facelift Price: स्टायलिश लूक, 26 हून अधिक सेफ्टी फीचर्स; नवीन Hyundai i20 फेसलिफ्ट भारतात लॉन्च, किंमत किती?

या एक्सपेरिअन्शिअल ड्राईव्हमध्ये एसयूव्ही ब्रँड मालकांचा सहभाग आहे. हे टोयोटाद्वारे भारतात आयोजित केलेल्या सर्वात पहिल्या ग्रेट 4x4 एक्सपीडीशनचा भाग असणार आहेत. तसेच एक्सपेरिअन्शिअल ड्राईव्ह मार्ग 4X4 चाहत्यांना 4X4 एसयूव्हीच्या प्रभावी लाइन-अपसह मोहक राजमाची धबधब्याकडे नेतील.

या एक्सपीडीशनचा एक अविभाज्य घटक म्हणून, टीकेएम ने 4WD ट्रॅकची रचना अतिशय काळजीपूर्वक केली आहे. यात नैसर्गिक अडथळे आहेत. जसे की आर्टिक्युलेशन, साइड इनलाइन्स, रॅम्बलर, खोल खड्डे असणार आहेत.

टोयोटामध्ये ग्राहकांची सुरक्षा आणि सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. तसेच आवश्यक सुरक्षा उपाय जागोजागी आहेत. या व्यतिरिक्त एक्सपीडीशन दरम्यान सहभागींना 4X4 तज्ञांकडून चांगले मार्गदर्शन केले जाणार आहे.

Toyota Great 4x4 X-Pedition:
TVS Apache RTR 310: फक्त २ सेकंदात ४५ किलोमीटर प्रतितास वेग, TVSची लाखमोलाची बाइक लाँच

दरम्यान, कर्नाटकातील सकलेशपूर येथे मे महिन्यात "ग्रेट 4X4 एक्सपीडीशन " यश मिळालं होतं. त्यानंतर आता 4X4 एसयूव्ही एक्सपेरिअन्शिअल ड्राइव्हचा हा दुसरा टप्पा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com