प्रसिद्ध वाहन उत्पदक कंपनी Hyundai India ने भारतीय बाजारपेठेत आपली प्रीमियम हॅचबॅक i20 फेसलिफ्ट लॉन्च केली आहे. याची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 6.99 लाख रुपये असेल. कारचे पुढील आणि मागील बंपर नवीन मॉडेलमध्ये अपग्रेड करण्यात आले आहेत.
याच्या समोर एक नवीन 2D Hyundai लोगो देण्यात आला आहे. एक्सेटर आणि न्यू वेर्नामध्येही तेच पाहायला मिळतं. याच्या इंटीरियरमध्येही काही बदल पाहायला मिळत आहेत. सुरक्षेसाठी या कारमध्ये 26 फीचर्स देण्यात आले आहेत.
Hyundai i20 फेसलिफ्ट इंजिन
या प्रीमियम हॅचबॅकमध्ये 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. जे जास्तीत जास्त 83Hp ची पॉवर आणि 115Nm चा पीक टॉर्क जनरेट करू शकते. याचे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. या 1.2 पेट्रोल इंजिनमध्ये Idle Stop and Go (ISG) फिचर आहे. कंपनीने 1.0 लिटर पेट्रोल व्हेरिएंट बंद केले आहे. हे इंजिन 7 स्पीड DCT आणि 6 स्पीड iMT सह आले आहे. (Latest Marathi News)
Hyundai i20 फेसलिफ्टचे फीचर्स
या कारच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, अॅम्बियंट लाइटिंग, डोअर आर्मरेस्ट आणि लेदरेट पॅडिंग यांसारखे फीचर्स यात कायम ठेवण्यात आलेआहेत. यात 10.25-इंच टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, अँड्रॉइड ऑटोसह Apple कारप्ले, 7 स्पीकरसह बोस साउंड सिस्टम, वायरलेस चार्जर मिळत आहे.
यात सिंगल-पेन सनरूफ आणि ऑटोमेटिक एअर कंट्रोल देखील आहे. यात यूएसबी चार्जिंग पोर्टही उपलब्ध असतील. Amazon Grey सह 6 मोनोटोन आणि 2 ड्युअल-टोन रंग पर्यायांमध्ये ग्राहक ही कार खरेदी करू शकतात.
Hyundai i20 फेसलिफ्ट सेफ्टी फीचर्स
या हॅचबॅकमध्ये 26 सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये 6 एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट (VSN), 3-पॉइंट सीट बेल्ट आणि सर्व सीटसाठी सीटबेल्ट रिमाइंडर यासह इतर अनेक फीचर्स आहेत. यात 60 हून अधिक कनेक्टेड कार फीचर्स देण्यात आले आहे. यात EBD, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS), रिव्हर्स पार्किंग सेन्सर आणि ऑटोमॅटिक हेडलॅम्पसह ABS देखील आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.