Warning signs of diabetes: ७-८ तास झोपूनही शरीर दमलेलं वाटतंय? हाय ब्लड शुगरचा इशारा असू शकतो

early symptoms of hyperglycemia causing constant fatigue: पुरेशी झोप घेतल्यानंतरही सकाळी थकवा जाणवत असल्यास रक्तातील साखर वाढण्याचं हे लक्षण असू शकतं. हाय ब्लड शुगरची इतर लक्षणं आणि नियंत्रणासाठी आवश्यक उपाय जाणून घ्या.
early symptoms of hyperglycemia
early symptoms of hyperglycemiaSAAM TV
Published On

रात्री पूर्ण ७-८ तासांची झोप घेतल्यानंतर सकाळी फ्रेश वाटू लागतं. मात्र अनेकांना इतक्या तासांची झोप घेऊनही सकाळी थकवा जाणवतो. कदाचित तुम्हालाही असं वाटत असेल. अशावेळी दिवसभर शरीरात एनर्जी नसल्यासारखं वाटू लागतं. परंतु असं का होतं याचा तुम्ही विचार केलाय का?

अनेकदा या गोष्टींना आपण रोजच्या कामाचा तणाव किंवा धावपळीचं जीवन याला जबाबदार धरतो. मात्र हे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढण्याचं एक प्रमुख लक्षण असू शकतं. ज्यावेळी शरीरातील इन्सुलिन संतुलन बिघडते त्यावेळी पेशींपर्यंत पोहोचण्याऐवजी ग्लुकोज रक्तात जमा होतं. यामुळे पेशींना एनर्जी मिळत नाही, ज्यामुळे थकवा येतो.

हाय ब्लड शुगर आणि थकवा यांच्यातील संबंध

हायपरग्लाइसेमिया म्हणजेच उच्च रक्तातील साखर, तुमच्या उर्जेच्या पातळीवर परिणाम करते.

पेशींसाठी ऊर्जेचा अभाव

ग्लुकोज शरीराला एनर्जी देतं. ज्यावेळी हे ग्लुकोज इन्सुलिनच्या कमतरतेमुळे किंवा प्रतिकारामुळे पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही तेव्हा शरीर थकल्यासारखं वाटतं .

early symptoms of hyperglycemia
Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

डिहायड्रेशन

ज्यावेळी रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा किडनी जास्त प्रमाणात लघवी तयार करते. ज्यामुळे जमा असलेली जास्त साखर बाहेर पडेल. जेव्हा शरीरातून द्रवपदार्थ बाहेर पडतात तेव्हा डिहायड्रेशन होतं आणि थकवा येतो.

early symptoms of hyperglycemia
Signs Of Cancer In Men: सावधान! अचानक वजन कमी झाले अन् थकवा जाणवतो; पुरुषांनो असू शकतात 'या' कॅन्सरची लक्षणे

या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

वारंवार तहान लागणं आणि लघवी होणं

दृष्टी धुसर होणं

जखम बरी होण्यास कालावधी जास्त लागणं

अचानक वजनात घट होणं

हाता पायांमध्ये मुंग्या येणं

थकवा सतत जाणवत असेल तर काय केलं पाहिजे?

रक्तातील साखरेची तपासणी करा

घरी ग्लुकोमीटर किंवा लॅबमध्ये तुमच्या HbA1C आणि उपवासातील साखरेची तपासणी करा.

भरपूर पाणी प्या

तुमच्या शरीरातील टॉक्सिन पदार्थ बाहेर काढण्यासाठी दिवसभर भरपूर पाणी प्या.

early symptoms of hyperglycemia
Fatty Liver Symtoms : फॅटी लिव्हरचे सुरुवातीचे संकेत हातावर! या सामान्य लक्षणांना दुर्लक्ष करु नका

एक्टिव्ह राहा

दर ४५ मिनिटांच्या कामानंतर ५ मिनिटांचा चालण्याचा ब्रेक घेतला तर फायदेशीर ठरेल. तसंच मध्यम शारीरिक हालचालीमुळे इन्सुलिन रेसिस्टंस सुधारतो.

आहारातील बदल करा

तुमच्या आहारातून मैदा, साखर आणि गोड पदार्थ ताबडतोब काढून टाका. प्रोटीन आणि फायबरयुक्त पदार्थ खा.

early symptoms of hyperglycemia
Fatty Liver: फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेजिस्टेंसला नियंत्रणात कसं ठेवाल? जीवनशैलीत करा हे ३ बदल

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com