Fatty Liver Symtoms : फॅटी लिव्हरचे सुरुवातीचे संकेत हातावर! या सामान्य लक्षणांना दुर्लक्ष करु नका

Liver Health : हातांवर दिसणारे बदल हे फॅटी लिव्हरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. लालसरपणा, खाज, कोरडी त्वचा आणि सूज ही लक्षणे तज्ज्ञ दुर्लक्षित करू नका असे सांगतात.
Fatty Liver Symptoms
Fatty Liver Symptomsgoogle
Published On

फॅटी लिव्हर म्हणजे तुमच्या लिव्हर किंवा यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी जमा होणे. ही समस्या अनेकांना सामान्य वाटते. मात्र असे अजीबात नाही. तुम्हाला यामुळे भविष्यात मोठ्या आणि गंभीर आजाराला सामोरे जावे लागू शकते. कारण आपण अनेकदा ब्लड प्रेशर, वजन किंवा शुगर तपासतो. पण शरीरातल्या आणखी भांगावर होणारे बदल आपल्याला लवकर समजत नाहीत. पुढे आपण फॅटी लिव्हरची सामान्य वाटणारी लक्षणे कोणती? यासंबंधीत संपूर्ण माहिती दिली आहे.

तज्ञांच्या मते, लिव्हरवर ताण येऊ लागल्यावर हार्मोनल बदल आणि रक्तप्रवाहातीलच्या वेळेस अडचणी हातांच्या त्वचेवर दिसू शकतात. तळव्यांवर लालसरपणा दिसणे, हातांना खाज येणे, कोरडी व पातळ त्वचा जी सहज जखमी होते, तसेच लहान लाल जाळ्यासारख्या रक्तवाहिन्या दिसणे ही याची काही लक्षणे आहेत. काही रुग्णांमध्ये बोटांचे टोक सुजलेले किंवा विकृत दिसण्याची समस्या देखील जाणवते. ही सर्व लक्षणे सुरुवातीला किरकोळ वाटली तरी ती लिव्हर नीट कार्य करत नसल्याची महत्त्वाची चिन्हे ठरतात.

Fatty Liver Symptoms
Fitness Diet: ओमलेट की उकडलेले अंडे? वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय कोणता?

आजकाल फॅटी लिव्हरची अनेक प्रकरणे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) या स्थितीशी जोडली जातात. हे प्रामुख्याने अयोग्य आहार, लठ्ठपणा, इन्सुलिन प्रतिरोध आणि उच्च कोलेस्ट्रॉलमुळे होते. या कारणांमुळे लिव्हरमधील चरबीचा साठा वाढतो आणि त्याची फिल्टरिंग व हार्मोन-नियमन करण्याची क्षमता कमी होते.

त्यामुळे त्वचेमध्ये, रक्तवाहिन्यांमध्ये आणि एकूण आरोग्यामध्ये घातक बदल दिसू लागतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हातांवरील अशा लक्षणांकडे वेळेत लक्ष दिल्यास फॅटी लिव्हरचा पहिल्या टप्प्यातच शोध लागतो आणि योग्य उपचार व जीवनशैलीतील बदल करून हा आजार नियंत्रणात आणता येतो.

Fatty Liver Symptoms
Rented House : रेंटवर राहणाऱ्यांच्या कामाची बातमी, जाणून घ्या तुमचे हक्क आणि कायदेशीर नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com