Sakshi Sunil Jadhav
अंडी हा पर्याय भारतीयांच्या नाश्त्यासाठीचा आवडता पदार्थ मानला जातो.
त्यामध्ये ओमलेट, उकडलेली अंडी, भुर्जी अशा अनेक अंड्यांपासून तयार करणाऱ्या पदार्थांचा समावेश असतो.
पुढे आपण वजन कमी करताना उकडलेले की ओमलेट काय खाऊ शकतो? याचे उत्तर जाणून घेऊ शकतो.
तज्ज्ञांच्या मते दोन्ही पर्याय योग्य आहेत. कारण अंड्यांमध्ये असलेले प्रोटीन हे दोन्ही पदार्थांमधून पोटात जाते. मात्र हे पदार्थ बनवण्याची पद्धत चुकीची आहे.
उकडलेले १ अंड खाल्ले तर त्यामध्ये तुम्हाला ७० कॅलेरीज, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतात.
तुम्ही जर ओमलेट खाल्ले तर तुमच्या शरीरातील कॅलेरीजचे प्रमाण वाढते.
तुम्ही जर ओमलेट साध्या पद्धतीने बनवले तर त्याचा तुमच्या शरीराला फायदा आहे. मात्र त्यात खूप तेल, चीज, बटाटा अशा पदार्थांचा समावेश करु नये.
तुम्ही ओमलेटमध्ये विविध भाज्यांचा वापर करुन सेवन करु शकता ही पद्धत तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मदत करेल. शिवाय तुमचे पोट सुद्धा भरलेले वाटेल.