Sakshi Sunil Jadhav
भाड्याने घेतलेल्या घरात भाडेकरूला कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय राहण्याचा पूर्ण अधिकार आहे.
घरमालकाला पूर्वसूचना न देता घरात येता येणार नाही. फक्त भाडेकरूच्या परवानगीनंतर ठरलेल्या वेळेत प्रवेश करता येईल.
घरमालक अचानक किंवा मनमानी पद्धतीने भाडे वाढवू शकत नाही. ठराविक नियम व नोटीसनुसारच वाढवणे शक्य आहे.
घर रिकामं केल्यानंतर भाडेकरूला जमा केलेला सिक्युरिटी डिपॉझिट परत मिळतो. घरमालक नकार देऊ शकत नाही.
घरातील मोठे स्ट्रक्चरल रिपेअर्स जसे छप्पर, भिंती, पाईपलाईन दुरुस्त करण्याची जबाबदारी घरमालकाची असते.
घरमालक सूचना न देता भाडेकरूला घर सोडण्यास भाग पाडू शकत नाही.
भाडेकरू व घरमालक दोघांनीही करारातील अटींचे पालन करणे आवश्यक आहे. यामुळे वाद टाळले जातात.