Sakshi Sunil Jadhav
१ कप उडीद डाळ ५-६ तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवून घ्या.
भिजलेली डाळ चांगली निथळून घ्या.
डाळ कमी पाण्यात बारीक वाटून हलकंसर मिश्रण तयार करा.
त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, मीठ घाला.
मिश्रण हाताने ५ मिनिटे फेटून हलके व फुलवून घ्या.
ओल्या हाताने छोटे गोळे घेऊन गोलसर किंवा डोनटसारखा आकार द्या. मग कढईत तेल तापवून ठेवा.
स्लो आचेवर सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत वडे तळून घ्या.
गरमागरम उडीद डाळीचे वडे नारळ चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.
NEXT : Chana Dal Vada : कुरकुरीत चणा डाळीचे वडे कसे बनवायचे? जाणून घ्या रेसिपी