Sakshi Sunil Jadhav
१ कप चणा डाळ, २-३ हिरव्या मिरच्या, १ कांदा, आले, लसूण, कोथिंबीर, मीठ व तेल इ.
सर्वप्रथम चणा डाळ ३-४ तास पाण्यात भिजवून घ्या.
डाळेचे पाणी नीट काढून टाका.
डाळ, मिरची, आले, लसूण, थोडी कोथिंबीर एकत्र करून जाडसर वाटून घ्या. बारीक चिरलेला कांदा, मीठ व आवडीनुसार मसाले घालून मिक्स करा.
मिश्रणाचे छोटे गोळे करून हाताने flatten करून वडा बनवा. कढईत पुरेसे तेल गरम करून ठेवा.
मध्यम आचेवर वडे सोनेरी व खुसखुशीत होईपर्यंत तळा.
गरमागरम वडे चटणी किंवा केचपसोबत सर्व्ह करा.