Fatty Liver: फॅटी लिव्हर आणि इन्सुलिन रेजिस्टेंसला नियंत्रणात कसं ठेवाल? जीवनशैलीत करा हे ३ बदल

Insulin resistance and fatty liver: सतत थकवा, गोड खाण्याची इच्छा आणि अंगदुखी ही इन्सुलिन रेजिस्टेंस व फॅटी लिव्हरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील बदल आणि योग्य आहारामुळे या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं.
Insulin resistance and fatty liver
Insulin resistance and fatty liversaam tv
Published On

आपला एखादा दिवस असा असतो की, आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. अशावेळी दिवसभर थकवा राहणं, अंगदुखी होणं असे त्रास होऊ लागतात. काही लोकांना सतत गोड खाण्याची इच्छा ही होऊ लागते. आपण याकडे दुर्लक्ष करतो. मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ही लक्षणं वाढत्या इन्सुलिन रेजिस्टेंस आणि फॅटी लिव्हरचे संकेत असू शकतात.

ही एक अशी समस्या असते की, बहुतेक लोकांना रक्तातील साखरेची पातळी जास्त प्रमाणात वाढल्याशिवाय लक्षात येत नाही. भारतीयांनी आपला आहार आणि जीवनशैलीच्या सवयींकडे लक्ष दिलं पाहिजे असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ज्यामुळे लिव्हर हळूहळू फॅटी आणि शरीर इन्सुलिन रेजिस्टेंस बनू शकतं.

Insulin resistance and fatty liver
Liver Cancer Symptoms: तुम्हाला सामान्य वाटणारी ही लक्षणं असून शकतात लिव्हर कॅन्सरची; शरीराच्या 'या' बदलांवर लक्ष द्या

इन्सुलिन रेजिस्टेंस म्हणजे नेमकं काय?

इन्सुलिन हे रक्तातील साखरेचं नियमन करणारं हार्मोन आहे. ज्यावेळी शरीराच्या पेशी इन्सुलिनला सामान्यपणे प्रतिसाद देणं थांबवतात तेव्हा त्याला इन्सुलिन रेजिस्टेंट म्हणतात. हे खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव, धूम्रपान आणि मद्यपान यासारख्या घटकांमुळे होऊ शकतं.

तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, वेळेवर जीवनशैलीत बदल करून प्रीडायबिटीज आणि फॅटी लिव्हरमध्ये सुधारणा होऊ शकते. यासाठी आपल्याला जीवनशैलीत कोणते बदल करावे लागतील ते पाहूयात.

Insulin resistance and fatty liver
Liver Problems: लिव्हरला पूर्णपणे पोखरतात हेपेटाइटिस B आणि C; पाहा व्हायरस शरीरात गेल्यावर पहिल्यांदा काय बदल दिसतात?

रात्री उशीरा खाणं

तज्ञांच्या मते, रात्री उशिरा खाल्ल्याने शरीराची सर्कॅडियन रिदम बिघडतं. रात्री इन्सुलिन सेंसिटिव्हिटी कमी होते. ज्यामुळे रक्तातील साखर आणि कोर्टिसोलची पातळी वाढू शकते. ही पद्धत साखर नियंत्रणात बिघाड करू शकते. त्यामुळे रात्री लवकर जेवण करणं आणि आहारात भाज्यांना प्राधान्य देणं चांगलं मानलं जातं.

नाश्त्यामध्ये प्रोटीनची कमतरता

हाय प्रोटीन आणि कमी ग्लायसेमिक नाश्त्याने दिवसाची सुरुवात केल्याने दिवसभर रक्तातील साखरेचं संतुलन राखण्यास मदत होते. यामुळे तुमची भूक कमी होते. त्यामुळे प्रत्येक जेवणात हेल्दी फॅट्स आणि फायबर समाविष्ट करणं आणि साखरेचं सेवन कमी ठेवणं मदत करू शकतं. हार्मोनल संतुलन आणि रक्तातील साखरेचं नियमन करण्यासाठी पुरेशी झोप आणि ताणाचं व्यवस्थापन देखील आवश्यक आहे.

Insulin resistance and fatty liver
Women Body Changes After Marriage: लग्नानंतर महिलांच्या शरीरात होतात ५ मोठे बदल

स्ट्रेंथ ट्रेनिंग न करणं

स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारण्यास मदत होते. यामुळे रक्त प्रवाह सुधारतो आणि नर्व डॅमेज आणि डोळ्यांच्या समस्या यासारख्या मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत होण्याचा धोका कमी होतो. हे वजन नियंत्रण, रक्तदाब कमी करण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी सुधारण्यास देखील मदत करतं. शिवाय यामुळे ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.

Insulin resistance and fatty liver
Post marriage changes women: लग्नानंतर महिलांच्या शरीरात होतात २ मोठे बदल; नव्या अभ्यासातून समोर आली धक्कादायक बाब

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com