Liver Problems: लिव्हरला पूर्णपणे पोखरतात हेपेटाइटिस B आणि C; पाहा व्हायरस शरीरात गेल्यावर पहिल्यांदा काय बदल दिसतात?

Early signs of hepatitis liver infection: हिपॅटायटीस बी आणि सी हे सायलेंट लिव्हर इन्फेक्शन मानले जातात. त्यांची लक्षणं, संसर्ग कसा पसरतो, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Liver Problems
Liver Problemssaam tv
Published On

हिपॅटायटीस बी आणि सी यांना सायलेंट किलर म्हटलं जातं. या दोन्ही समस्या झाल्यात हे अनेकांना कळत देखील नाही. हा व्हायरस शरीरात शिरला की तो त्याची लक्षणं पटकन लक्षात येत नाहीत. हिपॅटायटीस बी आणि सी हे लिव्हरचं इन्फेक्शन असून ते रक्त आणि शरीरातील द्रवपदार्थांद्वारे पसरू शकतात.

जर या समस्येचं वेळेवर निदान आणि उपचार झाले तर ते नियंत्रणात आणलं जाऊ शकतं. लसीकरण आणि निरोगी जीवनशैलीद्वारे देखील हे इन्फेक्शन रोखता येऊ शकतं. हिपॅटायटीस बी आणि सीची लक्षणं आणि ते कसे टाळायचे ते पाहूयात.

Liver Problems
Breast Shape Change: स्तनाच्या आकारात झालेला बदल शरीराचा गंभीर इशारा असू शकतो! कॅन्सरच्या शक्यतेकडे दुर्लक्ष नको

लक्षणं

  • यकृताला सूज येणं

  • थोडा थकवा येणं

  • भूक न लागणं

  • मळमळ

  • पोटदुखी

ही हेपेटायटीस बी आणि सी ची ही मुख्य लक्षणं मानली जातात. मात्र अनेकदा कोणतीही लक्षणं दिसून येत नाहीत आणि इन्फेक्शन शांतपणे वाढतो. जर उपचार केले नाहीत तर सिरोसिस किंवा लिव्हरच्या कॅन्सरच्या धोका वाढतो. यामध्ये लोकांना अन्न पचवण्यासही त्रास होतो.

Liver Problems
Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

कसा पसरतो हा व्हायरस?

हा व्हायरस सहसा रक्त, वापरलेली सुई, असुरक्षित ब्लड ट्रांसफ्यूजन, टॅटू किंवा लैंगिक संबंध याद्वारे पसरतो. अशावेळी संसर्ग आईकडून बाळाला देखील होण्याची शक्यता असते. स्वच्छ सुई आणि सुरक्षित वैद्यकीय प्रक्रिया आवश्यक आहे. इतर कोणाचाही रेझर, टूथब्रश यांचा वापर कधीही करू नये.

यावर कसे केले जातात उपचार?

या इन्फेक्शननंतर पुढचं नुकसान टाळण्यासाठी औषधांनी हिपॅटायटीस बी नियंत्रित केला जातो. तर अँटीव्हायरल औषधांनीही हिपॅटायटीस सी वर उपचार करता येतात. वेळेवर औषधं घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करणं अत्यंत महत्वाचं आहे. स्वतःहून औषधं बंद करणं योग्य नाही.

Liver Problems
Brain Strok Warning: ब्रेन स्ट्रोक कसा ओळखायचा? 'ही' लक्षणं झोपेत दिसतात, डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

या इन्फेक्शनपासून बचाव कसा करावा?

हिपेटायटीस बी लसीकरण ही प्रतिबंधाची सर्वात प्रभावी पद्धत मानली जाते. मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांसाठी ती आवश्यक मानली जाते. निरोगी खाणं, कमी तेलकट आणि मसालेदार अन्न, मद्यपान टाळणं आणि नियमित व्यायाम करणं यामुळे देखील यकृताच्या समस्या टाळता येतात.

Liver Problems
Mini Stroke: छोट्या वाटणाऱ्या तक्रारी ठरू शकतात स्ट्रोकची सुरुवात, 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com