Early Morning Stroke Symptoms: सकाळी उठल्यावर ही लक्षणे दिसल्यास असू शकतो ब्रेन स्ट्रोकचा धोका; वेळीच घ्या काळजी

Early Morning Stroke Symptoms: सकाळी-सकाळी जर हा त्रास तुम्हाला होत असेल तर ही ब्रेन स्ट्रोकची लक्षणे असू शकतात. त्यामुळे ही लक्षणे दिसत असतील तर वेळीच काळजी घ्या.
Stroke Symptoms
Stroke SymptomsSaam tv
Published On
Summary

ब्रेन स्ट्रोक कधीही येऊ शकतो

ब्रेन स्ट्रोक येण्यामागची कारणे

सकाळी सकाळी दिसतात ही लक्षणे

सध्याच्या काळात कधी कोणाला काय होईल, हे सांगता येत नाही. तुमची तब्येत कधीही बिघडू शकते. सध्याच आपण कित्येक वेळा हॉर्ट अॅटॅक येताना बघतो. तसेच आता स्ट्रोकचेदेखील झाले आहे. अचानक शरीरातील ब्लड फ्लो थांबला जातो त्यामुळे मेंदूपर्यंत रक्तपुरवठा होत नाही. यामुळे अनेकदा माणसांचा जीव जाऊ शकतो.

Stroke Symptoms
Benefits of walking: निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली मिळाली! दररोज चाला फक्त इतकी पावलं, वजनही होईल कमी

ब्रेन स्ट्रोकमध्ये मेंदूपर्यंत रक्तपुरवठा पोहचत नाही. त्यामुळे ब्रेन डॅमेज, पॅरेलिसिसिस आणि जिवाला धोकादेखील निर्माण होऊ शकतो. दरम्यान, डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार, ब्रेन स्ट्रोकआधी तुम्हाला काही लक्षणे दिसतात. सकाळी उठल्या उठल्या जर ही लक्षणे दिसत असतील तर या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करु नका.

स्ट्रोक का येतो? (Why Brain Stroke Hit? )

ब्रेन स्ट्रोकचे दोन रुप असतात. पहिले म्हणजे इस्केमिक स्ट्रोक. यामध्ये मेंदूतील रक्तवाहिनीत रक्ताच्या गुठल्या तयार होतात. दुसरा म्हणजे रक्तस्त्राव, यामध्ये रक्तवाहिनी फुटते किंवा गळते.याचसोबत सुरुवातीला एक मिनी स्ट्रोक किंवा टीटीएदेखील येतो. हा भविष्यात येणाऱ्या मोठ्या स्ट्रोकचा इशारा मानला जातो. उच्च रक्तदाब, मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, लठ्ठपणा, हृदयरोग, शारीरिक हालचालींचा अभाव, मद्यपान यामुळे स्ट्रोक येतो.

Stroke Symptoms
Walking Health: नव्या वर्षात रोज १०००० पावलं चालण्याचा संकल्प केलाय! सगळ्यांनाच सूट होणार का? एक्स्पर्ट्सनं सांगितले ५ साइड इफेक्ट्स

सकाळी उठल्यावर दिसतात ही लक्षणे (Early Morning Brain Stroke Symptoms)

डॉक्टरांच्या मते, कधीकधी सकाळी उठल्यावर स्ट्रोकची लक्षणे दिसतात. तुमच्या चेहऱ्याची एक बाजू सैल किंवा वाकडी वाटते. तुम्ही हसत असाल तरीही चेहरा विचित्र वाटते. अचानक अशक्तपणा, शरीरात सुन्नपणा, विशेषतः हात आणि पाय सुन्न पडतात. शरीराच्या एका बाजूला झटके येणे हे यामागचे मुख्य कारण आहे. बोलताना अचानक अडचण येते. तुम्हाला एकदम नॉर्मल वाक्येदेखील बोलताना अडचण होत असेल ही स्ट्रोकची लक्षणे असू शकतात.

अचानक दृष्टी कमी होणे, कोणतीही गोष्टी डबल दिसणे, पूर्णपणे दिसणे बंद होणे, सकाळी उठल्यावर गोंधळ, बोलण्यात अडचण, चालताना अडखळणे अशा गोष्टी होत असतील तर तुम्हाला स्ट्रोक येऊ शकतो. ज्येष्ठ व्यक्तींमध्ये या गोष्टी होणे सामान्य आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करु नये.

टीप- वरील माहितीची साम टीव्ही पुष्टी करत नाही, अधिक माहितीसाठी तज्ज्ञांची संपर्क साधा.

Stroke Symptoms
Heart Health: झोपेत अचानक श्वास घ्यायला त्रास होतोय? हृदयाला कमी ऑक्सिजन पोहोचण्याची असू शकतात 'ही' ६ लक्षणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com