Surabhi Jayashree Jagdish
मेंदूतील रक्तपुरवठा करणारी एखादी रक्तवाहिनी फुटल्यास त्या ठिकाणी रक्तस्राव होतो आणि मेंदूमध्ये अचानक दाब वाढतो. हा दाब वाढल्यामुळे मेंदूचे कार्य बिघडू लागतं आणि शरीरात गंभीर बदल दिसू लागतात.
रुग्णाला अचानक प्रचंड, असह्य आणि विजेच्या झटक्यासारखी वेदना जाणवते. या वेदना काही सेकंदांत अतिशय तीव्र होतात. सामान्य डोकेदुखीपेक्षा ती खूप वेगळी आणि धोकादायक असते.
रक्तस्रावामुळे दृष्टीच्या भागावर दाब येतो. त्यामुळे दृष्टी धूसर, दुप्पट किंवा अर्धवट दिसू शकते. काही वेळा एकदम दृष्टीही जाऊ शकते.
फुटलेल्या रक्तवाहिनीमुळे मेंदूचा त्या भागावर परिणाम होतो जो हालचाल नियंत्रित करतो. त्यामुळे हात–पाय सुन्न होणं किंवा एक बाजू काम करेनाशी होणं हा त्रास होतो.
रुग्णाला बोलताना शब्द नीट उचारता येत नाहीत किंवा वाक्यं स्पष्ट उच्चारता येत नाहीत. काहीवेळा त्याला इतरांचं बोलणेही समजेनासं होतं.
मेंदूतील रक्तस्रावामुळे समतोल आणि हालचाली नियंत्रित करणारा भाग प्रभावित होतो. रुग्णाला चालताना पडल्यासारखं वाटतं. डोकं फिरल्यासारखं किंवा भोवळही येऊ शकते.
मेंदूवर अचानक वाढलेल्या दाबामुळे उलट्यांचा त्रास सुरू होतो. काही जणांना सतत मळमळ वाटते. डोकेदुखीबरोबर उलट्या दिसणं हा गंभीर इशारा आहे.