Surabhi Jayashree Jagdish
हिवाळ्यात बोरीवलीजवळची गोराई हे शांत, थंड आणि निसर्गरम्य वातावरणामुळे फिरण्यासाठी उत्तम ठिकाण मानली जाते. शहराच्या गोंगाटापासून दूर, समुद्राचा वारा आणि हिरवीगार नैसर्गिक जागा मनाला शांतता देतात.
याठिकाणी समुद्रकिनारे, बागा, पायवाटा आणि धार्मिक स्थळे पाहण्यास मिळतात. कुटुंब, मित्र किंवा एकट्यानेही आरामात वेळ घालवण्यासाठी ही जागा उत्तम ठरते.
गोराईचा समुद्रकिनारा शांत, स्वच्छ आणि गर्दीपासून दूर असा अनुभव देतो. इथे हिवाळ्यात समुद्राचा गार वारा आणि थंड हवाच वेगळा आनंद देतात. सकाळच्या वॉक किंवा सूर्यास्त पाहण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
गोराईतील पगोडा हा जगप्रसिद्ध ध्यान केंद्र आहे. त्याची भव्य रचना आणि निसर्गाच्या सान्निध्यातील शांतता मन विसावून टाकते.
याठिकाणी मिळणारा समुद्राचा खुला नजारा आणि बोटींची रेलचेल हे आकर्षण आहे. हिवाळ्यात याठिकाणी फिरण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी अनेक जण येतात.
जरी पार्क सध्या सुरू नसलं तरी त्याच्या बाहेरील भागात सुंदर हिरवळ आणि शांत पायवाटा आहेत. थंडीच्या दिवसात या भागात चालणं आणि नैसर्गिक दृश्यं पाहणं आनंददायी वाटतं.
खाडी परिसरात मासेमारी बोटी, समुद्राचं शांत पाणी आणि थंड वारा यामुळे एक वेगळाच अनुभव मिळतो. हिवाळ्यात याठिकाणी फिरायला खूप मजा येते. फोटोग्राफी करणाऱ्यांसाठी हे ठिकाण खास आहे.