

मुलांच्या शाळांना एकदा सुट्टी पडली की लगेचच सगळी मंडळी गावी जाण्याचा प्लान करतात. कारण लोकांना निसर्गाच्या सानिध्यात साधं जीवन जगायला सुद्धा खूप आवडतं. दैनंदिन जीवनशैलीत काही बदल ४ दिवस करून पाहावेत. याचा शरीराला खूप फायदाच होतो. पण सध्या लोकांच्या करिअरचा किंवा कामाचा प्रश्न असल्याने लोक आरामासाठी विशेष वेळ काढत नाहीत. पण तुमच्या शरीराला याची किती आवश्यकता आहे हे तुम्हाला एकदा मोठी आजार झाला की कळतं.
माणसाला जगायला ऑक्सिजनची गरज असते. ते मिळवण्यासाठी कोणतेही विशेष परिश्रम करावे लागत नाहीत. आपण ऑक्सिजन घेतोय हे कोणाला जाणवतही नाही. पण यावर तुमचं ह्रदय काम करत असतं. याचसोबत प्रत्येकाला ऑक्सिजनयुक्त रक्ताची गरज असते. पण जेव्हा हृदयाच्या धमन्या अरुंद होतात किंवा रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो, तेव्हा हृदयाच्या स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशा वेळेस तुम्हाला काही लक्षणं जाणवत असतात. जी फक्त हार्टशी संबंधित नसून इतर सुद्धा असतात. पुढे आपण याबद्दल जाणून घेणार आहोत.
छातीत दुखणं, श्वास घेताना जडपणा जाणवणं, आवळल्यासारखी किंवा कोणतरी छातीत दाबल्यासारखं वाटणं, तीव्र वेदना जाणवणं हे हृदयाला ऑक्सिजन कमी मिळत असल्याचं प्रमुख लक्षण मानलं जातं. या वेदना हात, मान, तोंड किंवा पाठीपर्यंत पसरू शकतात. काही वेळा ती बोथट स्वरूपात असली तरी ती दुर्लक्षित करणं धोकादायक ठरू शकतं. श्वास घेताना वाढणारी टोचणारी वेदना, त्यासोबत घाम येणं किंवा मळमळ होणं ही तातडीची लक्षणं आहेत.
थोडंसं चालताना किंवा जिने चढताना अचानक धाप लागणं, झोपेत अचानक श्वास घ्यायला त्रास होणं हे हृदयाच्या कमकुवत कार्याचं संकेत असू शकतं. हृदय पुरेसं रक्त पंप करू न शकल्याने फुफ्फुसांमध्ये द्रव साचतो आणि त्यामुळे श्वास घेणं कठीण होतं. ही अवस्था थकवा किंवा फिटनेसशी संबंधित असते असा अनेकांचा समज असतो. हृदय रक्तपुरवठा करण्यात अयशस्वी ठरत असल्याचं लक्षण असू शकतं.
यासोबतच चक्कर येणं, डोकं हलकं वाटणं, कामावर लक्ष केंद्रीत न होणं, गोंधळल्यासारखं वाटणं किंवा अचानक बेशुद्ध पडणं अशी लक्षणं दिसू शकतात. मेंदूपर्यंत पुरेसा ऑक्सिजनयुक्त रक्तपुरवठा न झाल्यामुळे ही अवस्था निर्माण होते. त्वचेचा रंग फिकट पडणं, अस्वस्थता किंवा अचानक भीती वाटणं हीही धोक्याची चिन्हं असू शकतं. अशी लक्षणं दिसल्यास वेळीच त्वरीत डॉक्टरांकडे धाव घेणं अत्यंत महत्वाचे आहे.
(डिस्क्लेमर: ही माहिती केवळ जनजागृतीसाठी आहे. कोणताही आजार किंवा लक्षण असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.