What is Mini Stroke
What is Mini Strokesaam tv

Mini Stroke: छोट्या वाटणाऱ्या तक्रारी ठरू शकतात स्ट्रोकची सुरुवात, 5 लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

What is Mini Stroke: मिनी स्ट्रोक म्हणजे काय आणि त्याची सुरुवातीची लक्षणं काय आहे ते आज आपण जाणून घेऊया. यामध्ये चेहरा सुन्न होणं, बोलण्यात अडचण, चक्कर येणं यांसारख्या संकेतांकडे दुर्लक्ष करू नका.
Published on

तुम्ही यापूर्वी स्ट्रोकबद्दल ऐकलं असेल...पण तुम्ही कधी मिनी स्ट्रोक बद्दल ऐकलंय का? 'मिनी स्ट्रोक'ला डॉक्टरांच्या भाषेत ट्रान्झियंट इस्केमिक अटॅक असं म्हणतात. ही समस्या मेंदूसाठी एक गंभीर समस्या असते. आपण अनेकदा छोट्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. त्याचा तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.

मिनी स्ट्रोकमध्ये आपल्या शरीरावर काही अशा छोट्या समस्या दिसतात. या समस्या अगदी काही वेळासाठी होतात. या मेंदूला कायमचं नुकसान पोहोचवत नाहीत. परंतु या समस्या भविष्यात मोठे आजार 'ब्रेन स्ट्रोक'चं कारण बनतात. या मिनी स्ट्रोकची लक्षणं समजून घेणं खूप महत्वाचं आहे. ही लक्षणं कोणती आहेत ते पाहूयात.

चेहरा लटकल्यासारखं वाटणं

अचानक तुमच्या चेहऱ्याचा भाग सुन्न झाला तर ते मिनी स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. हे लक्षण तपासण्यासाठी त्या व्यक्तीला हसण्यास सांगा. जर त्या व्यक्तीचं हास्य विचित्र दिसत असेल किंवा चेहरा एका बाजूला झुकला असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.

हाता-पायात अशक्तपणा

जर एखाद्या हातावर किंवा पायात अचानक जडपणा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर ही देखील 'मिनी स्ट्रोक'ची मुख्य लक्षणं असू शकतात. अनेकदा हा अशक्तपणा शरीराच्या एकाच बाजूला होतो . जर दोन्ही हात वर केले गेले किंवा एक हात खाली पडू लागला तर ही धोक्याची घंटा आहे.

What is Mini Stroke
Health Tips: महिलांना दररोज किती तासांची झोप असते आवश्यक? महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळ झोपतात?

बोलण्यात अडचण येणं

जर एखाद्या व्यक्तीला अचानक बोलण्यात त्रास होऊ लागला किंवा बोलताना शब्द स्पष्ट नसतील तर ते कधीही हलक्यात घेऊ नका. ज्यावेळी मेंदूत रक्त प्रवाहात व्यत्यय निर्माण होततो तेव्हा अशी परिस्थिती उद्भवते.

नजर धुसर होणं

मिनी स्ट्रोकच्या वेळी डोळ्यांसमोर अचानक अंधार पडतो. त्याचप्रमाणे अंधुक दृष्टी येते किंवा एकच गोष्ट दोनदा दिसू लागते. ही स्थिती सहसा अचानक येते आणि काही काळानंतर व्यक्तीला बरं वाटू लागतं. परंतु अशावेळी आपण त्वरित डॉक्टरांना भेटलं पाहिजे.

What is Mini Stroke
Liver Disease Symptoms: रात्री १ ते ३ दरम्यान जाग येतेय? असू शकतो लिव्हरचा धोका, वेळीच वाचा लक्षणं

अचानक चक्कर येणं

विनाकारण चक्कर येणं किंवा चालताना अचानक तोल जात असेल तर हे 'मिनी स्ट्रोक'चं लक्षण देखील असू शकतं. शिवाय यामध्ये व्यक्तीला गरगरल्यासारखं वाटू लागतं.

What is Mini Stroke
Sleep Quality: दररोज रात्री ३ वाजता तुम्हाला गाढ झोपेतून जाग येतेय? वाचा काय आहे याचा नेमका अर्थ

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com