Sleep Quality: दररोज रात्री ३ वाजता तुम्हाला गाढ झोपेतून जाग येतेय? वाचा काय आहे याचा नेमका अर्थ

Why Do I Wake Up At 3 AM Every Night: रात्री ३ वाजता अचानक जाग येते का? ताण, हार्मोन्स, मेंटेनन्स इन्सोम्निया आणि झोपेवर परिणाम करणारी महत्त्वाची कारणं यामागे असतात.
Why Do I Wake Up At 3 AM Every Night
Why Do I Wake Up At 3 AM Every Nightsaam tv
Published On

दिवसभराच्या थकव्यानंतर घरी जाऊन कधी एकदा पाठ टेकतो असं आपल्याला वाटतं. रोजच्या धावपळीनंतर प्रत्येकाला शांत झोप लागते. ही शांत झोप आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी फार गरजेची असते. परंतु रात्री शांत झोपल्यानंतर तुम्हालाही ३ वाजताच्या सुमारास जाग येते का? जर तुमच्या सोबतही असं घडत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

मानसिक आणि भावनिक ताणतणावाचा परिणाम हा तुमच्या नात्यांवरच नाही तर झोपेवरही पाहायला मिळतो. मेयोक्लिनिकच्या मते, मेंटेनेंस इंसोम्निया किंवा रात्री वारंवार जाग येणं ही एक सामान्य समस्या बनताना दिसतेय. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे स्ट्रेस.

Why Do I Wake Up At 3 AM Every Night
High Blood Pressure: शरीरात 'ही' लक्षणं दिसताहेत, सावध व्हा! असू शकतो कधीही न संपणारा त्रास

कोणत्या कारणांमुळे रात्री अचानक जाग येते?

ज्यावेळी तुमचं मन सतत अलर्टवर असतं आणि शरीर गाढ झोपेत जाऊ शकत नाही. कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आर्थिक चिंता किंवा आरोग्याच्या समस्यांमुळे रात्री जाग येऊ शकते. ताण वाढत असताना शरीर कॉर्टिसोल हार्मोन सोडतं. हे हार्मोन मेंदूला एक्टिव्ह ठेवण्यास मदत करतं. यामुळे कधीकधी भयानक स्वप्नं, भूतकाळातील दुखापती किंवा निद्रानाशाची चिंता यांचा त्रास वाढू शकतो.

त्याचप्रमाणे पाठदुखी, संधिवात, बोन-मॅरोच्या समस्या, एसिड रिफ्लक्स किंवा वारंवार लघवी होणं ही रात्री जाग येण्याची सामान्य कारणं आहेत. वयानुसार, या समस्या वाढू शकतात. यामुळे तुमच्या झोपेवर तुमचा परिणाम होत असतो.

Why Do I Wake Up At 3 AM Every Night
High Blood Pressure: ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी हाताचे 'हे' पॉइंट करा प्रेस, फक्त १० मिनिटांत मिळेल आराम

वयानुसार झोपेच्या पद्धतींमध्ये होतात बदल

वयानुसार झोपेच्या पद्धती बदलणं हे स्वाभाविक आहे. महिलांमध्ये रजोनिवृत्ती दरम्यान होणारे हार्मोनल बदल, विशेषतः इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनमधील चढउतार हे तुमच्या झोपेवर देखील परिणाम करतात. हॉट फ्लॅशेस आणि मूड स्विंगमुळे देखील तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय येऊ शकतो.

गाढ झोप लागण्यासाठी तुमच्या वातावरणाची महत्त्वाची भूमिका असते. खोलीत जास्त प्रकाश, बाहेरचा आवाज, अयोग्य तापमान किंवा पार्टनरचं घोरणं यामुळे झोपेत व्यत्यय येऊ शकतो. झोपण्यापूर्वी मोबाईल फोन किंवा लॅपटॉप वापरल्याने मेलाटोनिनचा स्राव कमी होतो. त्यामुळे खोली शांत, अंधारी आणि थंड ठेवणं आणि झोपण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी स्क्रीन टाइम टाळणं योग्य आहे.

Why Do I Wake Up At 3 AM Every Night
High Blood Pressure: औषधांशिवाय घरीच ठीक होईल हाय ब्लड प्रेशरची समस्या; डॉक्टरकडे जाण्याआधी ट्राय करा घरगुती उपाय

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com