ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा बल्ड प्रेशर सामान्यपेक्षा जास्त वाढते त्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होते. यामुळे हृदयावर परिणाम होतो. आणि आरोग्याशी संबधित अनेक समस्या होऊ लागतात.
लठ्ठपणा, अनहेल्दी लाइफस्टाइल, खाण्यपिण्याच्या चुकीच्या सवयी, शारिरीक हालचालीचा अभाव आणि स्ट्रेस या कारणांमुळे हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ शकते.
हाय ब्लड प्रेशरची समस्या असल्यास आपले शरीर काही संकेत देत असतं. यांना दुर्लक्ष करु नये.
जेव्हा ब्लड प्रेशर वाढते याचा परिणाम मेंदूच्या नसांवर होतो. यामुळे डोकेदुखीचा त्रास जाणवू लागतो.
हाय ब्लड प्रेशरमुळे शरीरातील अनेक भागात रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ लागते. यामुळे थकवा आमि चक्कर येण्याची समस्या होऊ लागते.
हाय ब्लड प्रेशरमुळे हृदयावर ताण येतो आणि हार्ट रेट वाढतो. तसेच भीती वाटणे आणि अस्वस्थता वाटणे सारख्या समस्या जाणवू लागतात.
डाएटमध्ये हिरव्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. बाहेरचे तळलेले आणि चटपटीत पदार्थ खाणं टाळा.
दररोज ३० मिनिटे वॅाक करा. तसेच योग किंवा ध्यान करा. धुम्रपान, दारु यांचे सेवन करु नका. पूर्ण झोप घ्या आणि वजन नियंत्रणात ठेवा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.