ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सिनेमांमध्ये पांढरा शर्ट, काली पॅंट आणि काळा कोट घालून युक्तिवाद करताना आपण वकील पाहिले असतील. पण तुम्हाला लॅायर आणि ॲडव्होकेट मधील फरक माहीत आहे का.
ज्या व्यक्तीने एलएलबीचे शिक्षण घेतले आहे म्हणजेच कायद्याचे शिक्षण घेतले आहे. त्यांना लॅायर (Lawyer) म्हणतात.
एलएलबीचे शिक्षण घेललेली व्यक्ती जोपर्यंत बार काउन्सिलची परीक्षा पास होत नाही आणि जोपर्यंत सर्टिफिकेट म्हणजेच सनद मिळत नाही. तोपर्यंत लॅायर कोर्टात केस लढू शकत नाही.
पोलीस आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे, कायदेशीर सल्ला देणे, खटल्याची तयारी करणे,केसशी संबधित क्लाइंट आणि साक्षीदार यांच्या मुलाखती घेणे, दस्ताऐवजाचा मसुदा तयार करणे आणि कधी कधी कोर्टात प्रतिनिधित्व करणे.
ज्या व्यक्तीने एलएलबीचे शिक्षण घेतले आहे आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाची परीक्षा पूर्ण करुन सनद मिळवलेली आहे. त्यांना अॅडव्होकेट म्हणतात.
अॅडव्होकेटला कोर्टात प्रतिनिधित्व करण्यासह केस लढण्याची परवानगी असते. कोर्टात आपल्या क्लाइंटची बाजू मांडण्याचा अधिकार असतो.
खटल्याशी संबधित आवश्यक कायदेशीर संशोधन करणे, पोलीस आणि तपास यंत्रणांना कार्यवाही करण्यासाटी मदत करणे, न्यायालयीन शिष्टाचार आणि योग्य वर्तनाचे पालन करणे यासह अजून काही महत्वाच्या जबाबदारी आहेत.
विशेष बाब म्हणजे लॅायर अॅडव्होकेट होऊ शकतो. परंतु अॅडव्होकेट लॅायर होऊ शकत नाही.