ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक मान्यतेनुसार, गंगाजलला खूप पवित्र मानले जाते.
काशीवरुन गंगाजल न आणण्यामागे अनेक धार्मिक मान्यता आहे. यामागची महत्वाची कारणे कोणती जाणून घ्या.
काशीला मोक्षनगरी मानले जाते. गंगा नदीमध्ये अनेक जीव राहतात. त्यांना देखील मोक्षचा अधिकार आहे.
जर तुम्ही काशीतून गंगाजल आणले तर नकळत तुम्ही या जीवांना सोबत आणता. आणि त्यांच्या मोक्षाच्या चक्रामध्ये व्यत्यय येतो.
काशीमध्ये सतत अंत्यसंस्कार होत असतात. त्यामुळे गंगेत विसर्जित केलेल्या राखेचा काही भाग या पाण्यामध्ये मिसळतो.
जर तुम्ही हे पाणी तुमच्या घरात नेले तर नकळत तुम्ही मृत आत्म्याच्या खुणा तुमच्या घरात आणता. यामुळे अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
काशीमध्ये अघोरी शक्ती सक्रिय मानल्या जातात. या शक्तींवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही नियम आहेत. एक म्हणजे येथील गंगेचे पाणी घरी घेऊन जाऊ नये.
मान्यतेनुसार, काशीहून तुम्ही काही पवित्र गोष्टी जसे की शिवलिंग, रुद्राक्ष आणू शकता. परंतु गंगाजल आणि माती आणणे टाळा.