ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
भातामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळ पोट अधिक काळ भरलेले राहते.
फायद्यासोबत भात खाल्ल्याचे नुकसान देखील आहेत. रोज भात खाल्ल्याने वजन वाढते आणि पोटाशी संबधित समस्या उद्धवू शकतात.
काही लोकांनी रात्रीचा भात खाणं टाळलं पाहिजे. अन्यथा आरोग्यावर काही गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते.
जर तुमचे वजन जास्त असेल तर रात्री भात खाणं टाळा. यामध्ये कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे वजन वाढू शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी रात्री अजिबात भात खाऊ नये. तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
पोटाशी संबधित समस्या असेल किंवा पोट फुगीचा त्रास असेल तर रात्रीचा भात खाणं टाळा. यामुळे पोटदुखीची समस्या वाढू शकते.
सांधेदुखीचा त्रास असल्यास रात्रीचा भात खाऊ नका. तांदळात काही असे घटक असतात जे सांधेदुखीचा त्रास वाढवतात.
पांढऱ्या भातामध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते. यामुळे हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांनी रात्री जेवणात भात खाऊ नये.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.