ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फोन रात्रभर चार्जला ठेवल्याने किंवा गरजेपेक्षा जास्त चार्जिंग केल्याने फोनची बॅटरी खराब होऊ शकते. आणि बॅटरी लाइफ कमी होऊ शकते.
बऱ्याच स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन बॅटरी असते. जी अडव्हान्स असते परंतु याच्याही काही सीमा आहेत.
फोन पूर्ण बंद होईपर्यंत वापरणे आणि त्यानंतर चार्ज करणे यामुळे बॅटरी खराब होऊ शकते.
१०० टक्के चार्जिंग झाल्यानंरही फोन चार्जला ठेवल्यास किंवा सोडल्यास बॅटरीची क्षमता कमी होऊ शकते.
ओव्हरचार्जिंगमुळे फोन गरम होऊ शकतो. ज्यामुळे बॅटरी आणि स्मार्टफोन दोन्ही खराब होऊ शकतो.
ओव्हरचार्जिंग आणि बॅटरी गरम झाल्याने फोनचा स्फोट होण्याची शक्यता वाढते.
चार्जिंग करताना फोन वापरु नका यामुळे बॅटरी आणि प्रोसेसर यावर ताण येतो.
२०% ते ८०% बॅटरी लेव्हलदरम्यान फोन चार्ज केल्याने बॅटरीलाइफ वाढते. आणि चांगली राहते.