ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शकुन शास्त्रानुसार घरात काही पक्ष्यांचे येणे शुभ मानले तर काही पक्ष्यांना अशुभ मानले जाते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की शास्त्रानुसार कोणत्या पक्ष्यांचे घरात येणे शुभ मानले जाते.
शास्त्रानुसार, पोपटाला कुबेरांशी संबधित मानले जाते. म्हणून घरात पोपट आल्याने आर्थिक स्थिती सुधारु शकते.
घरात कावळ्याचे येणे शुभ मानले जाते. तसचे कावळ्याचे घरात येणे पाहुण्यांच्या आगमनाचे संकेत देत असतं.
घुबडाला देवी लक्ष्मीचे वाहन मानले जाते. तर तुमच्या घराच्या आसपास घुबड दिसले तर लवकरच शुभ घडणार आहे.
जर तुमच्या घराच्या आसपास कोबंड्याचा आवाज ऐकू येत असेल तर लवकरच तुम्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटू शकता.
शास्त्रानुसार, जर तुमच्या घरात चिमण्यांनी घरटे बनवले असेल तर तुमच्या घरात लवकरच सुख- समृद्धीचे आगमन होणार आहे.