ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोक वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि रोप घरात लावतात. हे केवळ घरांचे सौंदर्य वाढवत नाहीत तर याचे असंख्य फायदे देखील आहेत.
वास्तु शास्त्रानुसार घरात काही झाडे लावल्यास फायदे होतात. त्याचप्रमाणे घरात बांबूचे झाड घरात लावणे हे शुभ आहे कि अशुभ चला तर जाणून घेऊया.
वास्तुशास्त्रानुसार घरात बांबूचे रोप लावणे शुभ मानले जाते.
मान्यतेनुसार, बांबूचे झाड पृथ्वी,अग्नि, वायु , पाणी आणि लाकूड या पाच घटकांचे प्रतिनिधित्व करते.
बाबूंचे रोप घरात लावल्याने घरात सकारात्मक उर्जेचा राहते. आणि घरात शांतता कायम राहते.
वास्तुशास्त्रानुसार, काही रोप किंवा वनस्पती घरात लावल्याने एखाद्याचे नशीब उजळण्यास देखील मदत होते.
वास्तुनुसार घरात किंवा आफिसमध्ये बांबूचे रोप लावण्यासाठी सर्वोतम दिशा पूर्व दिशा आहे. यामुळे आर्थिक स्थितीही सुधारते.
खिडकीजवळ या बांबूच्या रोपाला लावू नये यामुळे रोपाचे नुकसान होते.