ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड म्हणजेच वडापाव केवळ मुंबईतीच नव्हे तर संपूर्ण देशात लोकप्रिय आहे.
टेस्ट अॅटलसच्या ५० सर्वोत्तम सँडविचच्या यादीत वडापावचा समावेश करण्यात आला.
उकडलेलं बटाटे, आलं - लसूण पेस्ट, मोहरी, हिरवी मिरची, कढीपत्ता, लिंबू, हळद, बेसन, मीठ आणि पाव
उकडलेले बटाटे मॅश करुन त्यात हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट, लिंबाचा रस मीठ आणि हळद घालून मिश्रण तयार करुन घ्या.
एका कढईमध्ये तेल फोडणीसीठी तेल गरम करुन घ्या. यात मोहरी, कढीपत्ता घालून उकडलेल्या बटाट्याचे तयार केलेले मिश्रण मिक्स करा. आणि चांगले एकत्रित करुन घ्या.
बेसनाच्या पीठात मीठ, थोडी हळद आणि पाणी मिक्स करुन बेसनाचे जाडसर बॅटर तयाक करुन घ्या.
बटाट्याचे वडे बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून गरम तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.
पाव मधून कापून घेऊन यात ओली चटणी आणि लसूणची चटणी लावा. गरमागरम वडा पावमध्ये ठेवून सँडविच करुन घ्या. स्ट्रीट स्टाइल वडापावचा तयार आहे.