Health Tips: महिलांना दररोज किती तासांची झोप असते आवश्यक? महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळ झोपतात?

women sleep Timing: महिला पुरूषांपेक्षा जास्त वेळ झोप घ्यावी की नाही? वैद्यकीय शास्त्रानुसार, महिलांनी पुरूषांपेक्षा जास्त वेळ झोपावे. अशी यावर अनेक मतमतांतरे आहेत. चला जाणून घेऊया महिलांनी दररोज किती वेळ झोप घ्यावी.
women sleep Timing
Studies show women need more sleep than men due to hormonal changes and brain activitysaamtv
Published On
Summary
  • महिलांना दररोज ८-९ तासांची झोप आवश्यक आहे.

  • हार्मोनल बदल आणि मेंटल थकवा यामुळे महिलांना जास्त झोप लागते.

  • झोपेची कमतरता आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते.

  • झोप सुधारण्यासाठी चांगली दिनचर्या आणि विश्रांती महत्वाची आहे.

झोप तुमच्या कामावर, वय आणि तुमच्या जीवनशैलीवर अवलंबून असते. पण निरोगी राहण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी ७-८ तास झोप घेणे आवश्यक आहे. यापेक्षा कमी झोप घेतल्याने शरीरावर वाईट परिणाम होतो. पण तुम्हाला माहिती आहे का, महिलांनी पुरूषांपेक्षा जास्त वेळ झोप घेणं आवश्यक आहे? महिलांमध्ये होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्या जास्त झोपतात. त्यामुळे जाणून घेऊ महिलांनी किती वेळ झोप घेतली पाहिजे?

डॉक्टरांच्या मते महिलांच्या आयुष्यात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे त्यांना जास्त झोपेची आवश्यकता असते. मासिक पाळी, गर्भधारणा आणि (मेनोपॉज)रजोनिवृत्तीमुळे महिलांची झोप बिघडते. या स्थितीत महिलांची झोप अनेक वेळा खंडित होते आणि ८ तास झोपल्यानंतरही शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. महिलांच्या आरोग्याबाबत डॉ. मनन व्होरा यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय.

women sleep Timing
Workout mistakes: जीममध्ये अतिप्रमाणात व्यायाम धोकादायक! वर्कआऊट करताना 'या' चुका तुमची किडनी करतायत खराब

महिलांनी किती वेळ झोप घ्यावी?

महिलांना दररोज पुरूषांपेक्षा २० मिनिटे जास्त झोप घ्यावी. परंतु अनेकदा असे दिसून येते की, महिला पुरूषांपेक्षा कमी झोपतात. भारतात महिला सकाळी लवकर उठतात. घरातील कामे लवकर करण्याच्या नादात रात्री उशिरा झोपतात. त्याचा परिणाम त्यांच्या संपूर्ण दिवसावर पडत असतो. कामाच्या ठिकाणी महिलांना आळस आणि निरुत्साही वाटतं असतं. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो.

women sleep Timing
Sick mother and baby: आजारी असताना मातेने बाळाला स्तनपान करणं सुरक्षित आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?

महिलांनी दिवसातून कमीत कमी ८ तास झोप घेतली पाहिजे. जर तुम्हाला मासिक पाळी किंवा गरोदरपणात जास्त झोप येत नसेल, तर तुम्ही दिवसा झोप घ्यावी. कमीत कमी ८ तासांची गाढ झोप शरीराची दुरुस्ती करते. हार्मोन्स संतुलित करते. जर रजोनिवृत्ती दरम्यान निद्रानाशाची समस्या वाढली तर जेव्हा तुम्हाला झोप येईल, तेव्हा तुम्ही तुमची झोप घ्यावी.

Q

महिलांना दररोज किती वेळ झोप घेणे आवश्यक आहे?

A

महिलांनी दररोज किमान ८ ते ९ तास झोप घेणे आवश्यक आहे.

Q

महिलांना पुरुषांपेक्षा जास्त झोप का लागते?

A

महिलांमध्ये हार्मोनल बदल अधिक असतात तसेच त्या अधिक मेंटल मल्टीटास्किंग करतात, त्यामुळे त्यांना अधिक विश्रांतीची गरज असते.

Q

झोपेच्या कमतरतेमुळे महिलांच्या शरीरावर काय परिणाम होतो?

A

झोपेची कमतरता मानसिक तणाव, वजन वाढ, हार्मोनल असंतुलन, आणि थकवा वाढवते.

Q

महिलांसाठी चांगली झोप घेण्यासाठी काय उपाय आहेत?

A

ठराविक वेळेवर झोपणे, मोबाइलपासून दूर राहणे, कॅफिन टाळणे आणि रिलॅक्सिंग रुटीन पाळणे उपयोगी ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com