SBI Bank Recruitment 2023: तरुणांसाठी सुवर्णसंधी! SBI मध्ये ५२८० जागांसाठी पदभरती सुरु, कसा कराल अर्ज?

SBI Job Vacancy: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराला SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल.
SBI Bank Recruitment 2023: 5280 Job Vaccancy in SBI Bank Know How to Apply in Marathi
SBI Bank Recruitment 2023: 5280 Job Vaccancy in SBI Bank Know How to Apply in MarathiSaam tv
Published On

SBI Recruitment 2023:

तुम्ही जर पदवीधर असाल आणि बँकेत काम करण्याची इच्छा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची अधिसूचना करण्यात आली आहे. यामध्ये ५२८० जागांसाठी पदभरती सुरु करण्यात आली आहे.

सर्कल बेस्ड ऑफिसरच्या पदांवर भरतीसाठी अर्ज करू शकता. या रिक्त पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १२ डिसेंबर होती परंतु, मिळालेल्या माहितीनुसार १७ डिसेंबर करण्यात आली आहे. अर्ज (Application) करण्यासाठी उमेदवाराला SBI ची अधिकृत साइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. अर्ज प्रक्रिया कशी असेल, अर्ज कसा कराल हे जाणून घेऊया.

SBI Bank Recruitment 2023: 5280 Job Vaccancy in SBI Bank Know How to Apply in Marathi
Hiravi Mirchi Loancha Recipe | जेवणाची चव वाढवण्यासाठी घरच्या घरी बनवा हिरव्या मिरचीचे लोणच, पाहा रेसिपी

1. रिक्त पदे किती?

  • अहमदाबाद - ४३० पदे

  • अमरावती - ४०० पदे

  • बेंगळुरू- ३८० पदे

  • भोपाळ - ४५० पदे

  • भुवनेश्वर - २५० पदे

  • चंदीगड - ३०० पदे

  • चेन्नई- १२५ पदे

  • ईशान्य - २५० पदे

  • हैदराबाद - ४२५ पदे

  • जयपूर- ५०० पदे

  • लखनौ - ६०० पदे

  • कोलकाता- २३० पदे

  • महाराष्ट्र: ३०० पदे

  • मुंबई मेट्रो - ९० पदे

  • नवी दिल्ली - ३०० पदे

  • तिरुवनंतपुरम - २५० पदे

SBI Bank Recruitment 2023: 5280 Job Vaccancy in SBI Bank Know How to Apply in Marathi
Railway Recruitment 2023 : गोल्डन चान्स! परीक्षेशिवाय मिळेल थेट नोकरी, रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

2. शिक्षणाची अट किती?

उमेदवाराने कोणत्याही शाखेतून मान्यताप्राप्त पदवी केलेली असायला हवी. तसेच प्रादेशिक भाषेचे ज्ञान असायला हवे.

3. वयोमर्यादा

उमेदवारांचे वय २१ ते ३० वर्ष असायला हवे. त्याचवेळी राखीव प्रवर्गातून उमेदवारांना नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

4. शुल्क

  • सामान्य, OBC आणि EWS ७५० रुपये

  • SC/ST/PH : मोफत

SBI Bank Recruitment 2023: 5280 Job Vaccancy in SBI Bank Know How to Apply in Marathi
AIIMS Delhi Jobs Recruitment 2023 : तरुणांसाठी खुशखबर! सरकारी खात्यात नोकरीची सुवर्णसंधी, ३ हजार जागा रिक्त, कसा कराल अर्ज?

5. निवड प्रक्रिया कशी असेल?

  • ऑनलाइन (Online) लेखी परीक्षा

  • स्क्रीनिंग चाचण्या

  • मुलाखत

6. अर्ज कसा कराल?

  • उमेदवाराला अधिकृत वेबसाइटला (Website) भेट द्यावी लागेल.

  • लिंकवर क्लिक करून पुढील प्रोससला सुरुवात होईल.

  • त्यानंतर तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

  • यूजर आयडी आणि पासवर्डच्या मदतीने लॉग इन करा.

  • फॉर्म भरा आणि सबमिट करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com