Railway Recruitment 2023 : गोल्डन चान्स! परीक्षेशिवाय मिळेल थेट नोकरी, रेल्वेत ३०९३ पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज?

Jobs Without Exam In Railway : सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदीची बातमी आहे. आता परीक्षा न देता नोकरी भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. उत्तर रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे.
Railway Recruitment 2023
Railway Recruitment 2023 Saam Tv
Published On

Railway Recruitment 2023 Online Application Process:

सरकारी खात्यात नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आनंदीची बातमी आहे. आता परीक्षा न देता नोकरी भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. उत्तर रेल्वेच्या रेल्वे रिक्रूटमेंट सेलने शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहिरात जारी केली आहे.

या नोकरीसाठी (Job) ११ डिसेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरु केली जाणार आहे. तर अर्जाची अंतिम तारीख १ जानेवारी २०२४ आहे. तसेच अर्ज करण्यासाठी rrcnr.org च्या अधिकृत वेबसाटला भेट देऊ शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने रेल्वने (Railway) जारी केलेली अधिसूचना वाचणे गरजेचे आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या पदांसाठी एकूण ३०९३ रिक्त जागा आहे. यासाठी पात्रता किती आणि निवड कशी केली जाईल तसेच वयोमर्यादा आहे हे जाणून घ्या.

1. पात्रता

अर्ज (Application) करणाऱ्या उमेदवाराला मान्यता प्राप्त बोर्डातून किमान ५० टक्के गुणांसह १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय केलेलं असावं. एनसीव्हीटीने जारी केलेल्या जाहीरातीत आयटीआय उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

Railway Recruitment 2023
MPSC Bharati 2023 : सुवर्णसंधी! एमपीएसीत ८४२ पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया कशी कराल?

2. वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे १५ ते २४ वर्ष दरम्यान असावे. तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सूट देण्यात आली आहे. एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवरांना ५ वर्षांची सूट देण्यात आली आहे.

3. अर्ज कसा कराल?

  • रेल्वे rrcnr.org च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • Apprentice Online Application लिंकवर क्लिक करा.

  • कागदपत्रे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.

Railway Recruitment 2023
Famous Place In Nagpur : नागपूरमधील ही पर्यटनस्थळे स्वर्गच, बजेटमध्ये करा फिरण्याचा प्लान!

4. अर्ज फी

सामान्य आणि ओबीसी श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये आहे. तर SC/ST/PWBD/महिला उमेदवारांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com