Smartphone Tips: मोबाइल नेटवर्क एकदम टकाटक, पण कॉल लागत नाही; कारणं काय, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह कराल?

Smartphone Tips: अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला कॉल केल्यावर आवाज येत नाही. नेटवर्क जरी चांगले असले तर आवाच येत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे तुम्ही या टीप्स वापरा.
Smartphone Tips
Smartphone TipsSaam Tv
Published On
Summary

नेटवर्क आहे तरी कॉलवर आवाज येत नाही?

कॉल न लागण्यामागचे कारण काय?

यावर तोडगा काय? वाचा सविस्तर

सध्याच्या जगात फोन हा खूप महत्त्वाचा झाला आहे. कोणत्याही गोष्टीसाठी अवघ्या काही सेकंदात कॉल किंवा मेसेज करतात. अनेकदा तुम्हाला पूर्ण नेटवर्क असले तरीही कॉल लागत नाही. सिग्नल असूनही फोन लागत नसेल तर मनस्ताप होतो. नेहमीच जर असे असेल तर तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये काहीतरी ऑन राहिले असेल. त्यामुळे तुम्हाला ही अडचण येत असेल तर हे काम करा.

Smartphone Tips
Lava Smartphone Shark 2 : कमी किमतीत धमाकेदार फीचर्स! Lava Shark 2 मध्ये काय खास? जाणून घ्या

बॅटरी सेव्हर मोड

दिवसभर तुम्ही बॅटरी सेव्हर मोड सुरु ठेवा. जेणेकरुन फोनमध्ये जास्त वेळ बॅटरी राहिल. बॅटरी सेव्हरमुळे बॅकग्राउंडमध्ये सुरु असणाऱ्या इतर सेवा बंद होतात. यामुळे फायदा होतो. परंतु जर तुम्ही विनाकारण बॅटरी सेव्हर मोड ऑन ठेवला तर कॉल घेण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे जेव्हा गरज असेल तेव्हाच बॅटरी सेव्हर मोड ऑन करा.

5G किंवा वाय फाय कॉलिंग

अनेक ठिकाणी 5G नेटवर्क नाहीये. यामुळे 5G आणि 4G मध्ये स्विच होत राहते. यामुळे कॉल केल्यावर चांगला आवाज येत नाही. अचानक आवाज जातो.त्यामुळे तुमच्या नेटवर्कवरदेखील कॉलिंगची गुणवत्ता ठरलेली असते.

Smartphone Tips
Smartphone: तुमच्या मोबाइलचं नेटवर्क सारखं गायब होतंय...या सोप्या ट्रिक वापरा

फोन अपडेट

अनेकदा तुमच्या फोनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे फोन लागत नाही. तुमच्या फोनचे सॉफ्टवेअर अपडेट नसेल त्यामुळे फोन वापरताना अनेक अडचणी येतात. यामुळे तुम्ही सेटिंग्समध्ये जाऊन लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेट करा.जेणेकरुन तुम्हाला अडचण येणार नाही. फोन जर अपडेट नसेल तर हँगदेखील होतो. अनेक अॅप ओपन होण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे फोन अपडेट असणे गरजेचे आहे.

Smartphone Tips
Smartphone Tips : मोबइलवर कॉल आला, गाणी वाजली, पण आवाज कमी येतोय; काही सेकंदात असा करा प्रॉब्लेम सॉल्व्ह

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com